लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 बाद 174 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 6 चौकारांसह 70 चेंडूत 49 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही केला आहे. तो जेव्हा 21 धावांवर पोहचला तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 18 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट हा चौथा भारतीय तर एकूण जगातील 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी भारताकडून हा पराक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने केला आहे.
याचबरोबर विराटने या 18 हजार धावा सर्वात जलद करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने 344 सामने खेळताना 382 डावात या धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत एकाही फलंदाजाला 400 डावांपेक्षा कमी डावात हा टप्पा गाठता आला नव्हता.
याआधीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद 18 हजार धावा करण्याचा विक्रम विंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांच्या नावावर होता. त्यांनी 411 डावात हा पराक्रम केला होता. तर सचिन तेंडुलकरने 412 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा केल्या होत्या.
याबरोबरच विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद 15 हजार, 16 हजार आणि 17 हजार धावा करणाराही फलंदाज आहे.
विराटने या 18 हजार धावांचा टप्पा पार करताना यात 58 शतके आणि 85 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने या 18 हजार धावांपैकी टी20 मध्ये 2102 धावा वनडेत 9779 धावा आणि कसोटीत 6147 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू-
34357 धावा – सचिन तेंडुलकर
24064 धावा – राहुल द्रविड
18433 धावा – सौरव गांगुली
18028 धावा – विराट कोहली*
17253 धावा – विरेंद्र सेहवाग
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल एकमेव क्षेत्ररक्षक
–पाचवी कसोटी: टीम इंडियाच्या दुसऱ्या दिवसाखेर ६ बाद १७४ धावा
–Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!