---Advertisement---

या ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक

---Advertisement---

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या(इस्रो) मिशन चंद्रयान-2 चे आज(22 जूलै) यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरीकोटामधून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण झाले.

या चंद्रयान-2 प्रक्षेपण मोहिमेचे देशभरातून कौतुक होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या मोहिमेबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे(इस्रो) अभिनंदन केले आहे. यामध्ये क्रिडा क्षेत्रातील विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर अशा दिग्गजांचाही समावेश आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने या मोहिमेबद्दल म्हटले आहे की ‘चंद्रयान-2 चे प्रक्षेपण, भारतासाठी आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण. जय हिंद.’

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले आहे की ‘प्रेरणादायी! चंद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन.’

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीरने म्हटले आहे की ‘लहान मुल म्हणून नेहमी चंद्राकडे पाहुन त्यामध्ये काय दडले असले, असे मला आश्चर्य वाटायचे. चंद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण नक्कीच काही रहस्य उलगडेल आणि यामुळे पुढील पिढीला भारताच्या स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्रामसाठी मदत करण्यासाठी प्रेरणा मिळेल. इस्रोला या यशाबद्दल अभिनंदन.’

तसेच भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने म्हटले आहे की ‘चंद्रयान-2 च्या टीमचे यशस्वी प्रक्षेपणाबद्दल हार्दिक अभिनंदन.’

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन म्हणाला, ‘खरंच भारतासाठी ऐतिहासिक क्षण. चंद्रयान-2च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन.’

भारताच्या कसोटी संघाचा विश्वसनीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने चंद्रयान-2 मोहिमेचे कौतुक करताना म्हटले आहे की ‘इस्रो टीमचे अभिनंदन. भारतासाठी हा खूप अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.’

चंद्रयान-2 च्या यशस्वी मोहिमेमुळे भारत हा सॉफ्ट लँडिंग करणारा चौथाच देश ठरला आहे. याआधी असे अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी केले आहे.

https://twitter.com/ShuklaRajiv/status/1153229551960375299?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1153229551960375299&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fvirender-sehwag-gautam-gambhir-congratulate-isro-on-launch-of-chandrayaan-2%2Fstory-WX3ewQ95dTQyOxKhMHFBnL.html

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा. 

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

एकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी

तो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment