भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये येत्या १ जुलैपासून पुनर्निधारित पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी गुरुवारपासून (२३ जून) भारत विरुद्ध लिसेस्टरशायर संघात ४ दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ ६०.२ षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २४६ धावा अशा स्थितीत आहे. या दरम्यान भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली याने इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला.
तर झाले असे की, विराटने (Virat Kohli) इंग्लंडच्या मैदानावर रूटप्रमाणे (Joe Root) बॅटला हात न लावता बॅट मैदानावर (Bat Stand Upright) उभी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्यात काही यश आले नाही. यानंतर चाहते विराटला ट्रोल करत आहेत.
विराटने केली रूटची नक्कल
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून सलामीवीर शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांची विकेट गेल्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला आला होता. त्याने ६९ चेंडू खेळताना १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने खेळपट्टीवर आपल्या बॅटला कोणत्याही आधाराविना उभी करण्याचा प्रयत्न केला. त्याने २ वेळा बॅट उभी करण्याचा (Kohli Tried Bat Stand Upright Like Root) प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही.
असेच काहीसे, इंग्लंडचा फलंदाज जो रूट यानेही न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान केले होते. त्याने आपल्या बॅटला हात न लावता खेळपट्टीवर उभे केले होते. आता विराटनेही त्याच्याप्रमाणे बॅट हवेत उभी करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहून चाहत्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले आहे. त्याचे रूटची नक्कल करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काही चाहत्यांनी विराटला रूटप्रमाणे बॅट हवेत उभी करण्याची नक्कल करण्याऐवजी शतक करण्याची नक्कल कर, असा मजेशीर सल्ला दिला आहे.
Kohli tried to make his bat stand upright like Root 😭 pic.twitter.com/PJh32dsDPH
— Chand (@AbhiShake_18) June 23, 2022
After Joe roots magic which was seen on the pitch by balancing the bat @imVkohli trying the same 😂 pic.twitter.com/TUZpAUJSA1
— Yashwanth (@bittuyash18) June 23, 2022
असा राहिला पहिला दिवस
दरम्यान सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांना विशेष खेळ दाखवता आला नाही. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत याने एकट्याने खिंड लढवली. ११ चेंडू खेळताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ७० धावा करत भरत मैदानावर टिकून आहे. त्याच्याव्यतिरिक्त भारताकडून एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आलेले नाही. विराटच्या ३३ धावांव्यतिरिक्त रोहित शर्मा (२५ धावा) आणि उमेश यादव (२३ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले आहे.
लिसेस्टरशायर संघाकडून रोमन वॉकरने ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच विल डेविस आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ आणि १ विकेट घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पांड्याची सेना आयर्लंडमध्ये दाखल, इथेही फडकावणार विजयी पताका?
ENGvsIND: टीम इंडियासाठी गुड न्यूज, फलंदाजांना चारी मुंड्या चीत करणारा पठ्ठ्या मोठ्या संकटातून मुक्त
हिटमॅन ठरणार विक्रमवीर! पहिल्या कसोटीत आफ्रिदीचा ‘हा’ विक्रम मोडित काढणार