आशिया चषक 2023 मधील सर्वात मोठा सामना असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला शनिवारी (2 सप्टेंबर) सुरुवात झाली. कॅंडी येथे होत असलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघ या सामन्यात चांगली सुरुवात करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली हे स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला.
नांदेड जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी सावध सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. 4.1 षटकानंतर पाऊस आल्याने जवळपास अर्धा तास खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर बिनबाद 15 या धावसंख्येवरून भारतीय संघाने सुरुवात केल्यानंतर, त्यात षटकातील अखेरचा चेंडूवर आफ्रिदीने रोहितचा त्रिफळा उडवला. त्याने 11 धावा केल्या.
त्यानंतर सर्वांची नजर विराट कोहली याच्यावर होती. त्याने एक चौकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र, आफ्रिदीच्या पुढील षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची आतली कड घेऊन स्टम्पसवर आदळला. त्याने चार धावा केल्या.
(Virat Kohli Departed On 4 Against Shaheen In Asia Cup INDvPAK)