---Advertisement---

मोठी बातमी! १०० व्या कसोटीतही विराट शतक करण्यात अपयशी, अवघ्या ‘इतक्या’ धावांवर क्लीन बोल्ड

Virat-Kohli
---Advertisement---

मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना विराट कोहली (Virat Kohli) याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी (100th Test) आहे. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी ऐतिहासिक सामना आहे. त्यामुळे या सामन्यातून त्याच्याकडून सर्वांनाच शतकी खेळीची अपेक्षा होती. पण, पहिल्या डावात शतक करण्यापासून विराट दूर राहिला. 

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून रोहित शर्मा (२९) आणि मयंक अगरवाल (३३) सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. पण अर्धशतकी सलामी दिल्यानंतरही हे दोघे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पण, नंतर हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला. या दोघांनीही ९० धावांची भागीदारी केली.

मात्र, ही भागीदारी रंगत असतानाच ४४ व्या षटकात लसिथ एम्बुल्डेनिया याने अप्रतिम तिसरा चेंडू टाकला, ज्यावर विराट त्रिफळाचीत झाला. विराटने पहिल्या डावात ७६ चेंडूत ५ चौकारांसह ४५ धावा केल्या. त्याचे अर्धशतक केवळ ५ धावांनी हुकले.

खरंतर विराटने गेल्या दोन वर्षात शतकी खेळी केलेली नाही. त्याने अखेरचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध केले होते. पण यावेळी १०० वा कसोटी आणि विराटचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक हा योगायोग जुळून येईल, अशी इच्छा अनेक चाहत्यांना होती. मात्र, पहिल्या डावात विराट ४५ धावांवरच बाद झाला. आता जर या सामन्यात भारताने दुसरा डाव खेळला आणि विराटला फलंदाजीची संधी मिळाली, तर तो शतकी खेळी करू शकतो. विराटने आत्तापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ७० शतके केली आहेत.

तसेच त्याने शुक्रवारी ४५ धावांच्या खेळीदरम्यान ८००० कसोटी धावाही पूर्ण केल्या. या सामन्यात विराटबरोबर शानदार फलंदाजी करणाऱ्या विहारीने मात्र, अर्धशतक पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद

‘टेस्ट कॅप्टन’ बनताच ‘हिटमॅन’ ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू

विराटसह अश्विनसाठीही संस्मरणीय मोहाली कसोटी! दिग्गजांच्या पंक्तीत झाला सामील

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---