fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

On 6th August 1997 Sri Lanka pile up 952 against India in Colombo

August 6, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


६ ऑगस्ट १९९७, श्रीलंका ९५२-६ घोषित

१९९७ मध्ये आजच्याच दिवशी, श्रीलंकेने कोलंबोत भारताविरुद्ध ९५२ धावांची मजल मारत कसोटी इतिहासातील सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. इंग्लंडने १९३८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे केलेला ९०३ धावांचा विक्रम अर्जुन रणतुंगाच्या संघाने मागे सोडला.

१९९७ मध्ये, भारताने केलेला श्रीलंका दौरा त्यातील निरस कसोटी मालिकेसाठी ओळखला जातो. दोन्ही सामने विचित्र पद्धतीने अनिर्णित राहिले होते. पहिला पहिला सामना असा होता, जो यजमानांनी रणधुमाळी केल्यासाठी लक्षात ठेवला जातो.

आर प्रेमादासा स्टेडियमवरील फलंदाजांचे नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारताने नवज्योतसिंग सिद्धू, कर्णधार सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या शतकी खेळ्यांच्या जोरावर ८ बाद ५३७ या धावसंख्येवर डाव घोषित केला.

दुसर्‍या दिवसाच्या अखेरच्या सत्रात, निलेश कुलकर्णीने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर मार्वान अटापट्टूचा बळी घेत संस्मरणीय सुरुवात केली. दिवसाअखेर, श्रीलंकेची धावसंख्या ३९-१ अशी होती. त्यानंतर, सनथ जयसूर्या व रोशन महानामा यांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरशः रडवले.

सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा यांनी अनुक्रमे ३४० आणि २२५ धावा झळकावताना भारतीय गोलंदाजांचे हालहाल केले. त्यावर कळस म्हणून, अरविंदा डी सिल्वाने १२६ धावा जोडल्या.

जयसूर्या आणि महानामाची भागीदारी पूर्ण दोन दिवस टिकली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. ७५३ मिनिट एकत्रित फलंदाजी करत त्यांनी ५७६ धावांची भागीदारी रचली. त्यावेळी ते, कसोटी इतिहासातील व प्रथमश्रेणीच्या सर्वोच्च भागीदारीपासून अवघी एक धाव मागे राहिले. १९४६-४७ मध्ये भारताच्या विजय हजारे आणि गुल मोहम्मद यांनी ५७७ धावांची भागीदारी रचली होती.

जयसूर्या, महानामा व डिसिल्वाच्या खेळ्यांनंतर, कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि २० वर्षीय पदार्पण करणारा महेला जयवर्धनेने पाचव्या दिवशी अर्धशतके करत भारतीय क्षेत्ररक्षकांच्या जखमेवर मीठ चोळले.

पाचव्या दिवशी, १३ षटकांचा खेळ शिल्लक असताना निकाल लागणार नाही हे पाहून दोन्ही कर्णधारांच्या संमतीने खेळ थांबविण्यात आला.

जयसूर्याला त्रिशतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.


Previous Post

विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम

Next Post

“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“कृपया माझी तुलना धोनीसोबत करू नका”, रिषभ पंतने केली विनंती

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट खास, मोहम्मद सिराजने केला खुलासा

January 21, 2021
Photo Courtesy: MH File Photo
क्रिकेट

आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; ‘हे’ तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/SAIMedia

"टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील," बजरंग पुनिया

Photo Curtesy: Twitter/ Mipaltan & IPL

४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप

पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.