बांगलादेशविरुद्ध भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार असून पहिला सामना रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. यासाठी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने जबरदस्त तयारी सुरू केली आहे. त्याने सराव करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले.
विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकानंतर आराम दिला होता. त्यामुळे संघ त्यांच्याविनाच न्यूझीलंड दौऱ्याला गेला. आता या तिघांचेही संघात पुनरागमन झाले आहे.
टी20 विश्वचषकात विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 2022च्या हंगामातही सर्वाधिक अशा 296 धावा केल्या. बांगलादेश दौऱ्यात राहुलकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराटने इंस्टाग्रामवर सरावाचे काही फोटो शेयर केले. यामध्ये तो फलंदाजीच्या सरावाबरोबर फुटबॉल खेळतानाही दिसला.
विराटने बांगलादेशमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या 8 वनडे सामन्यात 90.66च्या सरासरीने 544 धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि दोन अर्धशतके देखील सामील आहेत. कोहली व्यतिरिक्त कोणताही भारतीय फलंदाज बांगलादेशमध्ये बांगलादेशविरुद्ध 500पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. या यादीच्या टॉप 5मध्ये कोहलीनंतर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), एमएस धोनी (MS Dhoni), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
— Virat Kohli (@imVkohli) December 2, 2022
विराटने बांगलादेशमध्ये आतापर्यंत 16 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 15 डावांमध्ये खेळताना 80.83च्या सरासरीने 970 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. Virat Kohli during Practice on Tour Of Bangladesh
तसेच सध्याच्या भारतीय संघातील असलेल्या बाकीच्या फलंदाजांच्या आकडेवारीबाबत बोलायचे झाले, तर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 4 सामन्यात 186 धावा केल्या आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 6 सामन्यात 143 धावा केल्या आहेत. सध्याच्या भारतीय संघात विराट असा एकमेव फलंदाज आहे ज्याने बांगलादेशमध्ये शतक झळकावले आहे.
या मालिकेतील दुसरा वनडे 7 आणि तिसरा वनडे 10 डिसेंबरला खेळला जाणार आहे. त्यानंतर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. हे सामने 14 आणि 22 डिसेंबरला खेळले जाणार आहेत.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाझ अहमद केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, कुलदीप सेन, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्नस लॅब्युशेनची कमाल! विंडीजविरुद्ध धावांचा पाऊस पाडताच झाला गावसकर, लारा यांच्या यादीत सामील
हे असं कुठं असतंय व्हय? चेंडू चमकवण्यासाठी रुटने लढवली अनोखी शक्कल, सहकाऱ्याच्या डोक्याचा केला वापर