भारतीय संघाने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला.
विराट कोहलीने या स्पर्धेनंतर भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. टी-२० विश्वचषकातील नामिबियाविरुद्धचा ४२ वा सामना हा त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या विजयासह भारताचा या स्पर्धेतील प्रवास संपला आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ देखील आता संपला आहे.
विराट कोहली आणि शास्त्री यांनी ही टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घोषित केले होते की, ते या स्पर्धेनंतर आपला पदभार सोडतील. सामन्यांनंतर विराट कोहली आणि शास्त्री यांचा एक भावूक व्हिडिओ समोर आला आहे.
नामीबियाविरुद्धच्या सामन्यानंतर कोहली आणि शास्त्री यांची जोडीही तुटली आहे. या जोडीने एकत्र काम करत भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. केएल राहुलने नामिबियाविरुद्ध विजयी चौकार ठोकताच प्रशिक्षक आणि कर्णधार जोडी खूपच भावूक झाली. या दोघांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने अनेक मालिका जिंकल्या होत्या.
भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, विराट कोहली आणि शास्त्री दोघांनाही माहित होते की त्यांच्या प्रवासाचा आता शेवट जवळ आला आहे. या प्रसंगी कोहली आणि शास्त्री खूप भावूक झाले, जे कॅमेऱ्यात कैद झाले. कोहलीनेही शास्त्रींचे खास अभिनंदन केले. सामना संपल्यानंतर त्याने प्रशिक्षक रवी शास्त्रींना घट्ट मिठी मारली.
https://www.instagram.com/p/CWBlnuQBxD1/
कोहलीने मुख्य प्रशिक्षक शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनाही मिठी मारली आणि निरोप घेतला. भारतीय जर्सीमध्ये कोहलीने रवी शास्त्रींना शेवटची मिठी मारल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हिटमॅन’ची कमाल फिल्डींग! रोहित शर्माने सूर मारत पकडला अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल
नामिबियाविरुद्ध पंतने केली अशी काही कृती की चाहत्यांना आठवला यष्टीरक्षक धोनी, पाहा व्हिडिओ
बॅटला पाय लागताच रिषभ पंतने केली मन जिंकणारी कृती, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक