भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली उत्कृष्ट फलंदाजी बरोबरच त्याच्या फॅशन सेन्समुळेही अनेकदा चर्चेत असतो. यात बऱ्याचदा त्याच्या दाढीच्या लूकची चर्चा होते. तसेच त्याच्या दाढीचा लूक हा सध्या देशभरात ट्रेंड झाला आहे.
त्याच्या याच दाढीचा त्याने इन्शुरन्स काढला असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याचा संघसहकारी केएल राहुलने ट्विटरवर शेअर केला होता.
Haha, I knew you were obsessed with your beard @imVkohli but this news of you getting your beard insured confirms my theory. 😂😂 pic.twitter.com/cUItPV8Rhy
— K L Rahul (@klrahul) June 8, 2018
तसेच केएल राहुलने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की “मला माहित आहे तूला तूझ्या दीढीची काळजी आहे. पण आता तू तूझ्या दाढीची इन्शुरन्सही काढला असल्याचे सिद्ध झाले आहे.”
या व्हिडिओत दोन व्यक्ती विराटच्या दाढीचे फोटो कोढत आहेत. त्यानंतर शेवटी विराट कोणत्यातरी कागदपत्रांवर स्वाक्षरी करत आहे.
केएल राहुलच्या या ट्विटनंतर युजवेंद्र चहल, उमेश यादव या खेळाडूंनीही ट्विट केला आहे.
The captain of all things cool both on and off the field! Curious to find out what this is all about 😁 #viratinsuresbeard
— Umesh Yaadav (@y_umesh) June 8, 2018
Just heard @imVkohli got his beard insured. The story between the legend and his beard continues! Always seen him protective about it, but didn’t expect this. #ViratBeardInsurance
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) June 9, 2018
परंतू आज विराटने ट्विट करुन त्याच्या दाढीच्या इन्शुरन्सच्या चर्चा मनोरंजक असल्याचे म्हटले आहे.
कदाचित हा व्हिडिओ विराटच्या मेणाचा पुतळा बनवण्यासाठी मोजमाप घेतानाचा असल्याची शक्यता आहे. हा विराटचा मेणाचा पुतळा नुकताच दिल्लीतील मदाम तुसाद म्यूझीयममध्ये ठेवण्यात आला आहे.
The talk around my beard is quite entertaining. @klrahul11, @buntysajdeh, @yuzi_chahal, @y_umesh it's popcorn time boys 😂 #ViratBeardInsurance
— Virat Kohli (@imVkohli) June 9, 2018
याआधीही रविंद्र जडेजाने दिलेल्या ‘ब्रेक द बियर्ड चॅलेंज’ला विराटने तो त्याची दाढी काढणार नसल्याचे सांगत नकार दिला होेता.
बीसीसीआयने विराटची नुकतीच 2016-17 आणि 2017-18 या दोन वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषकाच्या थीम साॅंगला तब्बल ३८ मिलीयन विव्ज!
–अर्जेंटीनाच्या फुटबाॅल चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी नाही
–मुंबईत रंगणार भारत विरुद्ध केनिया फूटबॉलच्या अंतिम सामन्याचा थरार
–८२ चौकारांची बरसात झालेल्या त्या वनडे सामन्याबद्दल थोडसं
–नेहरा गुरुजींच लाभल मार्गदर्शन, हा गोलंदाज करणार इंग्लंडच्या फलंदाजांच्या बत्त्या गुल