---Advertisement---

केरळ ते मेलबर्न, हवा फक्त किंग कोहलीचीच! विराटच्या भल्यामोठ्या कट आउटचे फोटो व्हायरल

On: मंगळवार, सप्टेंबर 27, 2022 9:56 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आता जुन्या फॉर्ममध्ये परतलेला दिसतोय. जवळपास दीड वर्षापासून रुसलेली त्याची बॅट पुन्हा बोलायला लागली आहे. कोहलीच्या फॉर्ममध्ये परतल्याने भारतीय संघाचा तसेच चहा त्यांचा जीव भांड्यात पडल्याचे दिसून येतेय. नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालाय. उभय संघ बुधवारपासून (28 सप्टेंबर) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत. पहिला सामना केरळमधील तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची केरळ क्रिकेट असोसिएशन जय्यत तयारी केली असून, स्टेडियमबाहेर विराटचा भला मोठा कट आउट उभारण्यात आला आहे. दक्षिण भारतात केवळ अभिनेत्यांचे असे मोठमोठे कट आउट लावल्याचे दिसून येतात.

 

विराट कोहली याचे चाहते संपूर्ण जगभरात दिसून येतात. तो जिथे जातो तिथे त्याचे चाहते पोहोचतात. केरळमध्येही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. ज्या स्टेडियममध्ये सामना होणार आहे, त्या बाहेर कोहलीचे मोठे कट आउट लावण्यात आले आहे. ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या समोरील गेटवर हे होर्डिंग लावण्यात आले आहे. कोहलीच्या या कट आउटचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

भारताप्रमाणेच परदेशातही कोहलीचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळला जाणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या भारत पाकिस्तान या विश्वचषकातील सामन्यापूर्वी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड बाहेर कोहलीचे पोस्टर लावण्यात आल्याचे दिसतेय. एम या अक्षरावर कोहलीचे कव्हर ड्राईव्ह मारतानाचे छायाचित्र आहे. भारतीय संघाला 23 ऑक्टोबर रोजी याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी20 विश्वचषक 2022 मधील पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आणखी एक क्लीन स्वीप! टीम इंडियाचे न्यूझीलंडविरुद्ध निर्भेळ यश; संजूचे प्रभावी नेतृत्व
संजूची लागली लॉटरी? विश्वचषकाच्या तोंडावर टीम इंडियात मिळणार महत्त्वाची जबाबदारी
INDvSA| हार्दिकसह तीन खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर; ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---