टी२० विश्वचषक -२०२१ च्या तयारीसाठी बुधवारी (२० ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक सराव सामना खेळवला गेला. दुबईच्या आयसीसी अकादमी मैदानावर हा सराव सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल जबरदस्त लयीमध्ये दिसला. पण विराट कोहलीने राहुल चाहरला एक सल्ला दिला आणि युवा फिरकीपटूने पुढच्याच चेंडूवर मॅक्सवेलला तंबूचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२१ खेळला. स्पर्धा संपून काही दिवस झाले आहेत. जेव्हा दोघे एका संघात होते, तेव्हा विराट कोहलीला मॅक्सवेलची सर्व ताकद आणि कमकुवतपणा माहित होता. कोहलीने नेमका याचाच फायदा घेतला असावा. जेव्हा मॅक्सवेलने राहुल चाहरला रिव्हर्स स्वीपने चौकार मारला, तेव्हा कोहलीने चाहरशी संवाद साधला.
सामन्याच्या १२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुलने मॅक्सवेलला त्रिफळाचीत केले. चेंडू मॅक्सवेलच्या बॅटची कड घेत स्टंपवर जाऊन आदळला. त्याने २८ चेंडूत ५ चौकार मारून ३७ धावांची खेळी खेळली.
https://www.instagram.com/p/CVQF48yFEGD/
सामन्यात रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आयसीसी टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. भारताने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाच्या १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने खेळपट्टी सोडण्यापूर्वी ४१ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या.
याशिवाय, केएल राहुल (३९) सोबत त्याने पहिल्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी रचली आणि दुसऱ्या गड्यासाठी सूर्यकुमार यादव (नाबाद ३८) च्या साथीने ५९ धावांची भागीदारी करून संघाला १७.५ षटकांत १५३ धावांचे लक्ष्य गाठत, सहज विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआय होणार मालामाल! आयपीएलचे प्रसारण हक्क विकून मिळवणार तब्बल ‘इतके’ कोटी
भारत-पाक सामन्यानंतर आयपीएलच्या दोन नव्या संघांवर होणार शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर