भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री आयरलँड दौऱ्यावर निघण्यापुर्वी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यावेळी विराटने त्याच्या मानेच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.
विराटला आयपीएल दरम्यान मानेची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पुढे असणारा महत्त्वाचा इंग्लंड दौरा लक्षात घेता कौंटी क्रिकेटला मुकावे लागले होते.
पण आता त्याने तो पुर्णपणे बरा असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, “मी 100 टक्के बरा आहे. माझी मान देखील बरी आहे. मी त्यासाठी 6 ते 7 सेशन केले आहेत. तसेच काही सरावाने मला उत्तम मदत झाली.”
विराटने नुकतीच 15 जूनला फिटनेसची यो-यो टेस्ट दिली होती. यातही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.
भारताचा संघ उद्या 23 जूनला आयरलँड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात अनुक्रमे 27 आणि 29 जूनला भारत विरुद्ध आयरलँडमध्ये दोन टी20 सामने होणार आहेत.
यानंतर भारताचा संघ तेथूनच थेट 3 महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडिया शनिवारी आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना
–Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?
–धोनीबाबत आणखी एका यष्टीरक्षकाचे मोठे वक्तव्य