पुणे। शनिवारी (27 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 43 धावांनी पराभव स्विकारावा लागला. पण भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत एकाकी लढत दिली होती.
याबरोबरच विराट वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. हा पराक्रम करताना त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे.
विराटने या सामन्यात 119 चेंडूत 107 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील 38 वे आणि सलग तिसरे शतक होते. त्याने विंडीज विरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यातही शतके केली आहेत.
त्यामुळे आता विराटचे वनडे क्रिकेटमध्ये 214 सामन्यात 59.90 च्या सरासरीने 10183 धावा झाल्या आहेत.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 18426 धावा केल्या आहेत. तसेच आता एमएस धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याने 330 सामन्यात 50.24 च्या सरासरीने 10150 धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू:
18426 – सचिन तेंडुलकर
11363 – सौरव गांगुली
10889 – राहुल द्रविड
10183 – विराट कोहली
10150 – एमएस धोनी
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप 5: कर्णधार विराट कोहलीने पुण्यात झालेल्या वनडेत केले हे खास विक्रम
–असा ‘विराट’ पराक्रम करणारा कर्णधार कोहली ठरला पहिलाच क्रिकेटपटू
–भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो