---Advertisement---

‘…म्हणून त्यादिवशी विराट कोहली रडला होता,’ संघ सहकाऱ्याचे स्पष्टीकरण

On: गुरूवार, जून 9, 2022 4:56 PM
Virat-Kohli-Emotional
---Advertisement---

विराट कोहली हे नाव सध्या फक्त भारतात नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. गेल्या काही वर्षात विराटने आपली ओळख निर्माण केली आहे. अनेकदा आपल्या जीवावर त्याने संघाला सामने जिंकवले आहेत. विराट फलंदाजीसोबतच त्याच्या हटके आणि एकदम आक्रमक सेलिब्रेशनसाठीही प्रसिद्ध आहे. मात्र, याच आक्रमक विराटला अनेकदा भावुक झाल्याचेही पाहायला मिळआले आहे. असाच एक प्रसंग विराटचा संघसहकारी प्रदीप सांगवान याने शेअर केला आहे.

प्रदीपने (Pradeep Sangwan) सांगितले की, “आम्ही पंजाबमध्ये १७ वर्षांखालील सामना खेळत होतो. शेवटच्या २-३ डावात विराटला (Virat Kohli) मोठी धावसंख्या करता आली नाही. आमचे प्रशिक्षक अजित चौधरी (Ajit Chaudhary) त्याला ‘चिकू’ म्हणायचे. विराट हा आमच्या संघाचा मुख्य खेळाडू होता आणि अजित सरांनी गंमतीत सुचवलं की पुढच्या सामन्यात तो खेळणार नाही हे सांगू. आम्ही सर्वांनी सरांच्या या गंमतीत सहभागी झालो.”

पुढे प्रदीपने सांगितले की,”सरांनी टीम मीटिंगमध्ये विराटच्या नावाची घोषणा केली नाही. तो त्याच्या खोलीत गेला आणि रडू लागला. त्याने सरांना फोन करून सांगितले की मी २०० ते २५० धावा केल्या आहेत. खरे सांगायचे तर त्या हंगामात त्याने मोठी धावसंख्या केली. शेवटच्या २-३ डावात त्याने पुरेशा धावा केल्या नाहीत. तो इतका भावूक झाला की त्याने राजकुमार सरांना (विराटचे बालपणीचे प्रशिक्षक) फोनही केला.”

त्यानंतर विराट प्रदीपकडे आला आणि विचारले “सांगवान सांग, काय झाले? मी या हंगामात खूप धावा केल्या. मी त्याला म्हणालो- हो हो, हे खूप चुकीचे आहे!’. त्याला रात्रभर झोपही येत नव्हती. तो म्हणाला- नाही, मला झोपायचं नाहीये. मी खेळत नाही तेव्हा झोपायला काय हरकत आहे?’ मग मी त्याला सांगितले की तो खेळत आहे. ही सगळी खोड होती.”

दरम्यान, विराटला संघात खेळायला संधी मिळाली नाही यासाठी तो रडत होता. यावरून विराटची क्रिकेटप्रती असणारे प्रेम ठळकपणे दिसून येते.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळलेत आयपीएल, जाणून घ्या एका क्लिकवर

केएल राहुलच्या ‘आऊट’ होण्याचा ‘या’ युवा फलंदाजाला फायदा, दिल्ली टी२०त देऊ शकतो सलामी

अशी कामगिरी करणारा ‘होप’ ठरला तिसराच फलंदाज; एकाचवेळी मोडले कोहली, रूटचे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---