भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या 75 धावांची आवश्यकता आहे. असे असताना भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या युवा फिरकीपटूं विरोधात चांगलाच चाचपडताना दिसतोय.
भारतीय संघाला इंदोर कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियासमोर आव्हान उभे करण्याची गरज होती. सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर विराटकडून संघाला अपेक्षा होती. मात्र, मॅथ्यू कुन्हमन याच्याविरुद्ध मोठा फटका खेळताना तो 26 चेंडूवर 13 धावांवर बाद झाला. संपूर्ण मालिकेत आतापर्यंत पाच डाव खेळला आहे. विशेष म्हणजे या पाचही वेळी त्याला आपली पहिलीच मालिका खेळत असलेल्या टॉड मर्फी व मॅथ्यू कुन्हमन यांनी बाद केले. मर्फीने 3 तर कुन्हमनने त्याला दोनदा तंबूचा रस्ता दाखवला.
विराटने या मालिकेत आतापर्यंत पाच डावांत 110 धावा केल्या आहेत. यामध्ये चकित करणारी गोष्ट म्हणजे विराटने या मालिकेत आत्तापर्यंत वेगवान गोलंदाजांचा एकही चेंडू खेळलेला नाही.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 88 धावांच्या आघाडीनंतर भारताचा दुसरा डाव केवळ 163 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी नॅथन लायन याने सर्वाधिक 8 बळी टिपले. तर, भारतासाठी चेतेश्वर पुजाराने 59 धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी अत्यंत अवघड होत असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे विजयी लक्ष पार करावे लागेल. हा सामना जिंकल्यास मालिका 2-1 अशी फरकावर येईल. त्यानंतर अहमदाबाद येथे होणारा अखेरचा सामना निर्णय ठरेल.
(Virat Kohli Got Out 5 Times In Border-Gavaskar Trophy 2023 Against Matthew Kuhnemann And Tod Murphy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने उरकला साखरपुडा, पार्टनरला किस करत जगाला सांगितली आनंदाची बातमी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन






