इंग्लडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ आधीच घोषित केला होता. गुरुवारी (१४ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली. माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीला या टी-२० मालिकेदरम्यान पुन्हा एकदा विश्रांती दिली गेली आहे.
आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याला वारंवार विश्रांती दिला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेत, तसेच आयर्लंड दौऱ्यातही विराट सहभागी नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट खेळला, पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात दुखापतीच्या कारणास्तव तो सहभागी होऊ शकला नाही.
वेस्ट इंडीविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जेव्हा भारताचा संघ घोषित केला गेला होता, तेव्हा विराटला त्यातून वगळले गेले होते. अशातच आता बीसीसीआयने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटला विश्रांती दिली आहे. चाहत्यांकडून विराटला दिल्या जाणाऱ्या या विश्रांतीविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. उभय संघातील या टी-२० मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल, तर वनडे मालिकेत शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवले गेले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs WI: टीम इंडियात ‘या’ फिरकीपटूचे पुनरागमन, कारकीर्द वाचण्यासाठी करेल सर्वतोपरी प्रयत्न
ENGvsIND: लॉर्ड्सवर होणाऱ्या महत्वाच्या वनडे सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि हवामान, वाचा सविस्तर
ENGvsIND: इंग्लंडला हरवणे सोपे नाही, वनडेतील कामगिरी पाहुन तुम्हीही असेच म्हणाल