पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरूद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी ४ वाजून ३६ मिनिटांनी श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. यात कुलदीप यादवने चार विकेट्स घेतल्या तर अश्विन आणि शमीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याने १ विकेट घेतली. पहिल्या डावानंतर भारताकडे ३५९ धावांची आघाडी होती.
या नंतर भारत फॉलो-ऑन देणार का पुन्हा फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील कसोटी सामन्यातही भारताने श्रीलंकेला फॉलो-ऑन दिला होता.
पण आज विराटने जे दुसऱ्या सामन्यात केले तेच आजही केले. श्रीलंकेला फॉलो-ऑन देऊन पुन्हा फलंदाजीस आमंत्रित केले. विराट कोहलीने २९ कसोटी सामन्यात कर्णधार राहताना तब्बल ४ वेळा फॉलो-ऑन दिला आहे. याबरोबर त्याने गांगुली, धोनी या दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पाहुयात भारताचे या आधीचे कर्णधार ज्यांनी समोरच्या संघाला किती फॉलो-ऑन दिले ते
७ – मोहम्मद अझरुद्दीन
४- गांगुली / महेंद्रसिंग धोनी / कोहली
३ – गावस्कर / द्रविड