आयसीसी प्रत्येक कसोटी सामना व प्रत्येक वनडे व टी२० मालिका झाल्यावर क्रमवारी जाहीर करत असते. या क्रमवारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
क्रमवारी ही खेळाडूंची त्या कालखंडातील क्रमवारी दर्शवत असते. परंतु ही क्रमवारी ज्या गुणांच्या आधारे ठरवली जाते त्यांनाही तेवढेच महत्त्व असते. त्याला इंग्रंजी भाषेत रेटिंग असेही म्हणतात.
२६११ खेळाडूंनी वनडेत आजपर्यंत एकतरी सामना खेळला आहे. यातील केवळ ११ खेळाडूंना वनडेत ९०० रेटिंगचा टप्पा पार करता आला आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये फक्त विराट कोहलीलाच हा कारनामा करता आला आहे. १२ जुलै २०१८ रोजी विराटने इंग्लंडविरुद्ध खेळताना ९११ रेटिंग्जचा टप्पा पार केला होता. तो या यादीत ६व्या स्थानी आहे.
सार्वकालीन वनडे क्रमवारीत विंडीजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स हे ९३५ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहेत. विराटला हा विक्रम मोडण्याची संधी २०१८मध्ये मिळाली होती परंतु त्याला तो कारनामा करता आला नाही.
तो ९०० पेक्षा जास्त रेटिंग पॉईंट्स मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू तसेच वनडे आणि कसोटी क्रमवारीत ९०० पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवणारा तो जगातील एकूण पाचवा खेळाडू आहे.
तसेच एकाच वेळी वनडे आणि कसोटी क्रमवारीत ९०० पेक्षा जास्त रेटिंग पॉईंट्स असणारे विराट दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स हे दोनच खेळाडू आहेत.
काय आहे सार्वकालीन वनडे क्रमवारी
वनडे कारकिर्दीत फलंदाजाने किंवा गोलंदाजाने आयसीसी क्रमवारीत कमावलेल्या गुणांची एक यादी केली जाते. त्यात सार्वधिक गुण मिळवलेल्या खेळाडूंना स्थान दिले जाते.
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ रोहित शर्मा, डेविड वाॅर्नर आणि विराट कोहली या यादीत पहिल्या २०खेळाडूंमध्ये आहेत.
टॉप १० खेळाडूंचे सार्वकालीन वनडे गुण
९३५ सर विवियन रिचर्ड्स (क्रमवारी -१)
९३१ झहीर अब्बास (क्रमवारी -२)
९२१ ग्रेग चॅपल (क्रमवारी -३)
९१९ डेव्हिड गॉवर (क्रमवारी -४)
९१८ डीन जोन्स (क्रमवारी -५)
९१० जावेद मिंयादाद (क्रमवारी -६)
९०९ विराट कोहली (क्रमवारी -७)
९०८ ब्रायन लारा (क्रमवारी -८)
९०२ एबी डिव्हिलियर्स (क्रमवारी -९)
९०१ हाशिम अमला (क्रमवारी -१०)
भारतीय खेळाडूंचे सार्वकालीन वनडे गुण
९०९ विराट कोहली (क्रमवारी- ७)
८८७ सचिन तेंडुलकर (क्रमवारी- १५)
८८५ रोहित शर्मा (क्रमवारी- १६)
८४४ सौरव गांगुली (क्रमवारी-२९)
८३६ एमएस धोनी (क्रमवारी-३२ )
८१३ शिखर धवन (क्रमवारी-४७ )
८११ मोहम्मद अझरुद्दीन (क्रमवारी-५० )
७८७ युवराज सिंग (क्रमवारी- ६७)
७८४ नवज्योत सिंग सिद्धू (क्रमवारी-६८ )
७७७ कपिल देव (क्रमवारी- ७४)
७७४ वीरेंद्र सेहवाग (क्रमवारी-७९ )
७५१ दिलीप वेंगसकर (क्रमवारी- ९५)
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात गेला थेट नग्न अवस्थेत
-काय सांगता! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झोपेत चालायचा!