विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू आहे. तो क्रिकेटसोबतच अनेक व्यवसायामधून पैसे कमवतो. तत्पूर्वी कोहलीने (31 मार्च) रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरला आहे. फॉर्च्युन इंडियाच्या यादीनुसार कोहलीने 66 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत कोहली पाचव्या स्थानावर आहेत. विराट कोहलीनंतर (Virat Kohli) एमएस धोनीचा क्रमांक येतो, ज्याने गेल्या आर्थिक वर्षात एकूण 38 कोटी रुपये कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माचा (Rohit Sharma) या यादीतील टॉप-20 मध्येही समावेश नाही.
या यादीत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचाही (Sachin Tendulkar) समावेश आहे, त्याने 28 कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्याच्याशिवाय सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) 23 कोटी रुपये, हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 13 कोटी रुपये आणि रिषभ पंतने (Rishabh Pant) 10 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
कर भरणारे भारतीय खेळाडू-
विराट कोहली – 66 कोटी
एमएस धोनी – 38 कोटी
सचिन तेंडुलकर – 28 कोटी
सौरव गांगुली – 23 कोटी
हार्दिक पांड्या – 13 कोटी
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्मासोबत फलंदाजी करणे म्हणजे…” स्टार खेळाडूने केले मोठे वक्तव्य
“ते 30 सेकंद अजूनही लाजवतात” विश्वचषक जिंकल्यानंतरचा किस्सा सांगताना दिग्गज भावूक
भारतीय फलंदाजांच्या सर्वात मोठ्या कमजोरीवर गिलने काढला तोडगा! खास तयारीबद्दलचा खुलासा