भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 धुव्वा उडवत मालिका आपल्या खिशात घातली. या कसोटी मालिकेत भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पूर्णपणे फ्लाॅप ठरले. विराट कोहलीच्या या खराब कामगिरीमुळे त्याचे आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) भारी नुकसान झाले आहे.
वास्तविक, विराट कोहली (Virat Kohli) आयसीसीने जाहीर केलेल्या साप्ताहिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. विराट कोहलीला टॉप-20 मध्येही आपले स्थान राखता न येण्याची 10 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोहलीसाठी ही निराशाजनक गोष्ट आहे.
विराट कोहली (Virat Kohli) 2014 नंतर प्रथमच टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. गेल्या काही काळापासून कोहलीची फलंदाजी कसोटीत खराब होत आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील 3 सामन्यांत कोहलीने केवळ 93 धावा केल्या होत्या. त्याच्या या खराब कामगिरीमुळे कोहली आता कसोटी फलंदाजी क्रमवारीत 22व्या स्थानावर घसरला आहे.
कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. सध्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताचे फक्त 2 खेळाडू टॉप-10 मध्ये आहेत. त्यातील पहिले नाव म्हणजे स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). जयस्वाल कसोटी फलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. तर विस्फोटक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सहाव्या स्थानी आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी कसोटीत 2011 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 118 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 201 डावात फलंदाजी करताना त्याने 47.83च्या सरासरीने 9,040 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 31 अर्धशतकांसह 29 शतके आहेत, तर कोहलीने 7 द्विशतक देखील झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्डकप गाजवणारा महाराष्ट्राचा पठ्ठा आता आयपीएलमध्ये खेळणार!
बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचू शकते, कसं ते जाणून घ्या
दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही बेन स्टोक्स! बीसीसीआयचा हा नवा नियम जाणून घ्या