भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे विश्वचषक 2023 मधील महत्वपूर्ण सामना रविवारी (22 ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांची लक्ष ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतासाठी अनुभवी विराट कोहली याने शानदार 95 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने असा एक पराक्रम केला ज्याच्या आसपासही कोणता फलंदाज नाही.
आपला चौथा विश्वचषक खेळत असलेल्या विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या या अति महत्त्वाच्या सामन्यात दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले. त्याने भारताला विजयाच्या नजीक नेले. मात्र, तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही. बाद होण्यापूर्वी त्याने 104 चेंडूत 95 धावांची खेळी केली. यामध्ये आठ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
विराटने आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 5786 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी तब्बल 90.4 इतकी जबरदस्त राहिली आहे. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी भारताचा सचिन तेंडुलकर असून त्याने 5490 धावा करताना 55.5 अशी सरासरी राखली. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मा याने 4290 धावा करताना 64 पेक्षा जास्तची सरासरी राखली.
भारतीय संघाचा या विश्वचषकातील हा सलग पाचवा विजय ठरला. विराटने आत्तापर्यंत या विश्वचषकात तीन अर्धशतके व एक शतक ठोकले असून, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात तो पहिल्या क्रमांकावर आहे.
(Virat Kohli Highest Average In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान