नेपीयर। आज(23 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्स विजय मिळवला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
या मालिकेत हार्दिक पंड्या आणि केएल राहुल या दोघांऐवजी विजय शंकर आणि शुभमन गिल या दोघांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
विजयने मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर गिल न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघात पुनरागमन करणार असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.
“मला काही खेळाडूंना संधी द्यायची आहे. जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत आणि स्थानावर खेळण्याचा अनुभव मिळेल. तसेच विश्वचषक स्पर्धा जवळ आल्याने तुम्हाला चांगले तयार राहण्यासाठी हा पर्याय उत्तम असल्याने मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे विराट न्यूझीलंड सामन्याच्या पत्रकार परिषदेत बोलत होता.
आजच्या सामन्यात अंबाती रायडू आणि कुलदिप यादव यांना संघात जागा दिली होती. यादवने 4 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली तर रायडूला आज परत एक संधी देण्यात आली. यामुळे गिलला पुढील सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर संघनिवड अधिकारी एमएसके प्रसाद यांनी आधीच सांगितले आहे की गिलला वरीष्ठ भारतीय संघाकडून खेळण्यास तयार आहे.
गिलने न्यूझीलंड येथे झालेल्या 2018च्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करत 104. 50च्या सरासरीने 418 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मॅन ऑफ टी टुर्नामेंटचा पुरस्कारही मिळाला होता. तसेच त्याने रणजी ट्रॉफीमध्येही 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–केवळ ३६ वनडे खेळलेल्या कुलदीप यादवने जगाला या गोष्टीमुळे दखल घ्यायला लावली
–ज्या देशात पाऊल ठेवतो त्या देशात हा भारतीय खेळाडू नादबाद खेळी करतो
–न्यूझीलंडमध्ये क्रिकेट सामन्यात लख्ख सुर्यप्रकाशामुळे कर्णधाराने खेळाडूला दिला गाॅगल