---Advertisement---

विराट कोहलीने एकमेव षटकार मारताच का होत आहे उमेश यादव सोबत तुलना? घ्या जाणून

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम सामना केपटाऊनच्या (Capetown)  मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज अडचणीत आले असता, विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली. त्याने पहिल्या डावात ७९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने मारलेला एक षटकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय. 

विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या डावात १२ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ७९ धावांची खेळी केली होती. त्याने ४१ व्या षटकात रबाडाच्या (Kagiso rabada) गोलंदाजीवर अप्रतिम पुल शॉट खेळत षटकार मारला. हा षटकार भारतीय डावातील पहिलाच षटकार होता. परंतु, हा षटकार मारताच, एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहे.

सुप्रसिद्ध क्रिकेट तज्ज्ञ आणि सांख्यिकीतज्ज्ञ मोहनदास मेनन (Mohandas Menon) यांनी लिहिले की, कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या ३ वर्षात विराट कोहलीच्या बॅट मधून निघालेला हा केवळ ५ वा षटकार आहे. विराट कोहली गेल्या २ वर्षांपासून मोठी खेळी करू शकलेला नाहीये. क्रिकेटच्या तीनही स्वरूपात त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. या डावात तो शतक झळकावणार असे वाटू लागले होते. परंतु ७९ धावांवर फलंदाजी करत असताना तो बाद होऊन माघारी परतला.

मोहनदास मेनन यांनी ट्विट करत लिहिले की, “आज विराट कोहलीच्या बॅटमधून निघालेला षटकार हा गेल्या ५ वर्षातील तिसरा षटकार आहे. त्याने यादरम्यान २५६८ चेंडूंचा सामना केला आहे. तर उमेश यादवने १५५ चेंडूंचा सामना करत ११ षटकार मारले आहेत.”

विराट कोहलीने शेवटचा षटकार पर्थ कसोटीत जोश हेजलवूडच्या चेंडूवर मारला होता. त्यानंतर आता कागिसो रबाडाच्या चेंडूवर मारला आहे. तर रोहित शर्माने ३१, मयांक अगरवालने २५ आणि रिषभ पंतने १८ षटकार मारले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

भारीच ना!! टप्पा पडताच बुमराहच्या चेंडूने बदलला काटा; काही कळायच्या आत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाद

भारतीय संघाकडून कोच राहुल द्रविडचा ४९ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो होतायेत व्हायरल

हे नक्की पाहा:

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---