रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनऊचा कर्णधार केएल राहुलने आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हे आमंत्रण स्वीकारत आरसीबीचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी संघाला 96 धावांची सलामी दिली. त्याचवेळी विराटने आयपीएलमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
यावर्षी आयपीएलमधील पहिल्या सामन्यात विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 82 धावांची नाबाद खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात त्याला अपयश आले. मात्र, या सामन्यात त्याने हे अपयश भरून काढत पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला.
विराटने सलामीला फलंदाजीला उतरत लखनऊच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने 4 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 35 चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे 51 वे आयपीएल अर्धशतक ठरले. बाद होण्यापूर्वी त्याने 44 चेंडूवर 61 धावा केल्या.
Second half-century of the season for @imVkohli 😎
He's enjoying his time with the bat here in Bengaluru 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/8BEE0rDvXu
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
त्याचबरोबर विराट आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या 14 पैकी 13 संघांविरुद्ध अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनला. विराटला मागील वर्षी लखनऊविरुद्ध अर्धशतक झळकावता आले नव्हते.
विराटने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स या सध्या खेळत असलेल्या संघांविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत. याव्यतिरिक्त डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स इंडिया, गुजरात लायन्स व रायझिंग पुणे सुपरजायंट्स या आयपीएलमध्ये खेळून गेलेल्या संघाविरुद्ध देखील त्याला अर्धशतक झळकावण्यात यश आले होते. विराट आपल्या कारकिर्दीत केवळ कोची टस्कर्स केरळविरुद्ध अर्धशतक ठोकू शकला नाही. 2011 हा आयपीएलचा एकच हंगाम खेळणाऱ्या कोची संघाविरुद्ध त्याने अनुक्रमे 23 व 27 धावा केल्या होत्या.
(Virat Kohli Hit Half Century Against 13 IPL Teams Most By Any Batter In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCBvLSG| चिन्नास्वामीवर नाणेफेक सुपरजायंट्सच्या पारड्यात, आरसीबीची प्रथम फलंदाजी
युवा कबड्डी सिरीजमध्ये आकाश शिंदेचं जोरदार आगमन