---Advertisement---

विराटबाबत आयसीसीकडून मोठी चूक, वेळेतच सुधारली नाहीतर…

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 3:43 PM
---Advertisement---

आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या क्रमवारीवरून मोठा गोंधळ घातला होता. वेळीच चूक लक्षात येताच आयसीसीने ती सुधारली. झाले असे की विराट वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्यानंतर आयसीसीने अव्वल क्रमांकावर विराट किती दिवस आहे हे मोजण्यात चूक केली होती.

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. विराटने पहिल्याच सामन्यात ९३ धावांची खेळी करत आयसीसी क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर उडी घेतली. तो याआधी २०२१मध्ये पहिल्या स्थानी होता. तसेच २०१३मध्येही त्याने पहिले स्थान प्राप्त केले होते. तो किती दिवस पहिल्या क्रमांकावर होता याबाबत आयसीसीने आकडेवारी पोस्ट केली होती. तेव्हा लक्षात आले की विराटची आकडेवारी चुकली, ती लगेचच त्यांनी सुधारली.

सुरूवातीला आयसीसीने विराट ८२५ दिवस पहिल्या स्थानी होता, असे पोस्ट केले होते. खरं म्हणजे तर तो एकूण १५४७ दिवस पहिल्या स्थानी होता. आयसीसीने त्यात सुधारणा केली. यामुळे वनडेत सर्वाधिक दिवस अव्वल क्रमांकाच्या सर्वकालिन यादीत विराट तिसऱ्या स्थानी आला.

विराटची आयसीसी वनडे क्रमवारीची आकडेवारी पाहिली तर तो लागोपाठ १२५७ दिवस पहिल्या स्थानी राहिला होता. ही कामगिरी त्याने २०१७ ते २०२१ यादरम्यान केली होती. सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकावर राहणारा विराट भारताचा पहिला आणि जगातील तिसरा खेळाडू ठरला. या यादीत वेस्ट इंडिजचे दिग्गज विव रिचर्ड्स सर्वाधिक असे २३०६ दिवस अव्वल स्थानी होते. तसेच ब्रायन लारा हे २०७९ दिवस पहिल्या स्थानी होते.

विराटने न्यूझीलंडच्या आधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार फलंदाजी केली होती. तोच फॉर्म त्याने न्यूझीलंडविरुद्ध कायम राखला. त्याचबरोबर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना शतक केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---