इंग्लंड आणि भारत यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीवर इंग्लंडने पकड मिळवली आहे. यजमान इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या जोरावर ३५४ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसर्या डावात भारताने केएल राहुलचा बळी लवकर गमावला. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने दाखवलेल्या हुशारीची चर्चा सध्या सुरू आहे.
खराब फटका खेळून परतला मलान
इंग्लंड संघाला मजबूत स्थितीत नेण्यात टी२० स्टार डेव्हिड मलानचाही मोठा वाटा आहे. तीन वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या मलानने शानदार ७० धावा करून पुनरागमन केले. अर्धशतकी खेळीनंतर तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते. मात्र, कर्णधार कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या चलाखीमुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले.
मलान ७० धावांवर खेळत होता, तेव्हा दुसऱ्या दिवशी चहापानापूर्वी शेवटच्या षटकात त्याला मोहम्मद सिराजने यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. मात्र, तो ज्या चेंडूवर बाद झाला होता, तो चेंडू चौकार मारण्यासारखा होता. कारण, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन पंतच्या हातात विसावला.
विराटने दाखवला सिराजवर विश्वास
जेव्हा चेंडू पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला, तेव्हा त्याला माहीतही नव्हते की चेंडू मलानच्या बॅटच्या लागून त्याच्या हातात आला आहे. त्यामुळे, पंतने कोहलीला डीआरएस घेण्यास भाग पाडले नाही. दुसरीकडे, सिराजला चेंडू बॅटला लागल्याची पूर्ण खात्री होती. त्यामुळे, सिराजने कोहलीला डीआरएस घेण्यासाठी उद्युक्त केले.
Mohammed Siraj strikes just before tea.
Gets Malan to feather an edge down the leg side.Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Malan pic.twitter.com/Zr5sMr7FkL
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 26, 2021
यानंतर, सर्वांच्या नजरा कोहलीवर होत्या. कारण, लॉर्ड्स कसोटीत सिराजने भारताचे सलग दोन रिव्ह्यू गमावले होते. मात्र, इथे कर्णधाराने आपल्या गोलंदाजावर विश्वास दाखवत डीआरएस घेतला आणि निकाल भारताच्या बाजूने लागला. यावेळी पंतकडे दुर्लक्ष करणे भारताच्या दृष्टीने चांगले झाले आणि मलानला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. मलानच्या चेहऱ्यावर बाद झाल्याची निराशा स्पष्ट दिसत होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम रूटच्या निशाण्यावर, पुढील दोन कसोटीत असेल संधी
यशस्वी जयस्वालच्या धमाक्याने मुंबईची ओमानवर मात, मालिकेत केली बरोबरी
‘मुंबई इंडियन्स साधणार विजेतेपदाची हॅट्रिक, भारतही जिंकेल टी२० विश्वचषक’, हार्दिक पंड्याचा विश्वास