कोणत्याही क्रिकेट संघात फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. पण, तेवढीच महत्त्वाची भूमिका असते ती कर्णधाराची. जेव्हापासून भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे, तेव्हापासून भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून संघ या यादीत अव्वल क्रमांकावर होता. आतापर्यंत विराटने आपली जबाबदारी खूप चांगल्याप्रकारे निभावली आहे.
असे असले तरी विराटनंतर भविष्यात कर्णधारपदाची जबाबदारी कोण सांभाळेल, याची तयारी भारतीय संघ आतापासूनच करताना दिसत आहे. काही युवा खेळाडूंना परदेशी दौऱ्यासाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. त्यामुळे ते आतापासूनच दबाव असतानाही चांगली कामगिरी करण्यास शिकतील.
या लेखात आपण त्या ३ युवा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे विराटनंतर भारतीय कसोटी संघात कर्णधार म्हणून खेळताना दिसू शकतात. या यादीत एक असाही खेळाडू आहे, ज्याने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तरीही तो कसोटी कर्णधार बनण्याचा प्रबळ दावेदार आहे.
विराटनंतर हे ३ युवा खेळाडू बनू शकतात कसोटी कर्णधार- Virat Kohli Indian Test Captain
३. हनुमा विहारी
सध्या भारतीय संघात ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हनुमा विहारीचे (Hanuma Vihari) नावही या यादीत सामील आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला सामना समजून घेण्याची असलेली समज. विहारी फलंदाजीव्यतिरिक्त गोलंदाजीतही आपले योगदान देण्याची क्षमता ठेवतो, जे त्याच्या पारड्यात पडू शकते.
विहारीने आतापर्यंत भारतीय कसोटी संघासाठी ९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३६.८० च्या सरासरीने ५५२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये एका शतकाबरोबरच ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करताना त्याने ३६ च्या सरासरीने ५ महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या आहेत.
विहारीने भारतीय अ संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याबरोबरच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. त्यामुळे तो विराटनंतर भारतीय कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसू शकतो. या खेळाडूमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नक्कीच आहे.
२. पृथ्वी शॉ
भारतीय कसोटी संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉदेखील (Prithvi Shaw) या यादीत सामील आहे. शॉचे वय जरी कमी असले, तरी जेव्हा त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, पण त्यासाठी त्याच्याकडे जवळपास ४ वर्षांचा अनुभव तरी असणे महत्त्वाचे ठरेल. जे त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
शॉने सलामीला फलंदाजी करताना भारतीय संघाकडून आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५५.८३ च्या सरासरीने ३३५ धावा केल्या आहेत. तसेच, यादरम्यान त्याने एक शतक आणि २ अर्धशतकेही ठोकली आहेत. शॉ कसोटीत आक्रमक अंदाजात खेळतानाही दिसतो.
शॉच्या नेतृत्वात १९ वर्षांखालील भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व करण्याचा अनुभव आधीपासूनच आहे. त्याचबरोबर तो विराटप्रमाणे आक्रमक खेळी करतानाही दिसतो. त्यामुळे तो विराटचा पर्यायी कर्णधार म्हटले जात आहे.
१. शुबमन गिल
भारतीय कसोटी संघासाठी आतापर्यंत शुबमन गिलने (Shubman Gill) एकही सामना खेळला नाही. परंतु असे असूनही तो या पदासाठी तो प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्यातील नेतृत्व करण्याची प्रतिभाही स्पष्ट दिसते.
गिल मागील ८ महिन्यांपासून भारतीय संघाचा भाग राहिला आहे. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, ही वेगळी बाब आहे. परंतु लवकरच त्याला संघाकडून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फॉर्म पाहून स्पष्टपणे म्हटले जाऊ शकते, की तो भविष्यातील स्टार फलंदाज आहे.
गिल भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो, की अनुभवी खेळाडूंची उपस्थिती असूनही त्याला भारतीय अ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. यातून भारतीय संघाच्या निवडकर्त्यांचा भविष्यातील मार्ग कसा असेल, याची झलक दाखवितो.
वाचनीय लेख-
-बाप योगायोग! क्रिकेटमधील ७ असे योगायोग, ज्यावर विश्वास बसणे केवळ कठीण
-जेव्हा वाजपेयी हसत म्हणाले, मग आपण पाकिस्तानमध्ये निवडणुकाही सहज जिंकू!
-२०११ विश्वचषक विजेत्या संघातील ५ असे हिरो, ज्यांचे योगदान फारसे कुणाला आठवत नाही