---Advertisement---

VIDEO । विराटने सांगितला जोकोविचकडून आलेल्या पहिल्या मेसेजचा किस्सा, भारतीय दिग्गजाला नव्हता बसला विश्वास

On: रविवार, जानेवारी 14, 2024 5:28 PM
Kane Williamson
---Advertisement---

सर्बिया स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री अलिकडच्याच काळात सर्वांसमोर आली. नुकतीच जोकोविचने भारतीय दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत असलेल्या संबंधाबाबत माहिती दिली. जोकोविच मागच्या काही वर्षांपासून विराट कोहली याच्यासोबत मेसेजवर बोलत असल्याचे समोर आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर विराट कोहली यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम (Grand Slam) स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलिया ओपन (Australian Open) सुरू आहे. ऑस्ट्रेलिया ओपनदरम्यान नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने विराट कोहली (Virat Kohli) विषयी खास प्रतिक्रिया दिली. जोकोविचच्या माहितीनुसार मागच्या काही वर्षांपासून हे दोघे दिग्गज एकमेकांसोबत मेसेजवर बोलत आहेत. पण दोघांची भेट अद्याप होऊ शकली नाहीये. आता विराटनेही जोकोविचच्या वक्तव्याशी समहती दर्शवली आहे.

बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. विराट या व्हिडिओत म्हणतो की, “मी नोवाकची इंस्टाग्राम प्रोफाईल पाहत होतो. मी मेसेजच्या बटनावर क्लीक केले आणि पाहिले की, त्याने आधीच मला मेसेज केला होता. मला सुरुवातीला विश्वास बसला नाही. फेक अकाऊंट असल्याचा संशय मला आला होता. पण नंतर मी त्याला मिळालेल्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानेही मला 50व्या वनडे शतकानंतर शुभेच्छा दिल्या होत्या.”

दरम्यान, विराट कोहली सध्या भारतीय संघासोबत अफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिका खेळत आहे. तब्बल 14 महिन्यांनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना भारताच्या टी-20 संघात निवडण्यात आले. नोव्हेंबर 2022 मध्ये भारताला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. या सामन्यात रोहित आणि विराटने टी-20 क्रिकेटमधून मोठी विश्रांती घेतली. पण अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशातील टी-20 मालिका खेळण्यासाठी या दोघांना पुन्हा एकदा संघात निवडले गेले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने संघाचे नेतृत्व केले. पण विराट वैयक्तिक कारणास्तव खेळला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी विराट उपलब्ध असेल. (Virat Kohli informed about the first message sent by Novak Djokovic)

महत्वाच्या बातम्या – 
‘आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा’, प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठे आधी पाकिस्तानातून जय श्रीरामचा नारा
Ranji Trophy: इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेअगोदर मयंकचा रणजीत धुमाकुळ, ठोठावलं भारतीय संघाचं दार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---