एमएस धोनी याच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे, मात्र यामध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो विराट कोहली याचा. विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवातच धोनीच्या नेतृत्वाखाली केली. धोनीने नेहमीच त्याला फलंदाजी करताना पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्याने त्याला भारताच्या कर्णधारपदासाठीही तयार केले. यामुळे जसे धोनीने नेतृत्व सोडले, ताबडतोब विराटची कर्णधारपदी वर्णी लागली. नुकतेच विराटची इंस्टा स्टोरी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने धोनीचा उल्लेख केला आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा एमएस धोनी (MS Dhoni) याचा किती मोठा फॅन आहे, हे सर्वांनाच माहित आहे. विराटने एका पाण्याच्या बॉटलचा फोटो शेयर केला आहे, ज्यावर धोनीचा फोटो आहे. हा फोटो शेयर करताना त्याने लिहिले, ‘तो सगळीकडे आहे. पाण्याच्या बॉटलवरही एमएस धोनी आहे.’ त्याची ही इंस्टा स्टोरी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावरही चाहते यावर अधिकाधिक कमेंट्स करत आहेत. यामध्ये काहींनी विराटला धोनीचा पहिल्या क्रमांकाचा फॅन म्हटले आहे.
धोनीने त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019मध्ये खेळला होता. हा सामना वनडे विश्वचषकातील उपांत्य फेरीचा होता. न्यूझीलंड विरुद्धच्या त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर धोनीने ब्रेक घेतला, नंतर तर कोरोना आल्याने ब्रेक सुरूच राहिला आणि 2020च्या आयपीएलच्या आधी 15 ऑगस्टला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
धोनी आताही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. काहींचे म्हणणे आहे की तो 2023च्या हंगामानंतर आयपीएलमधूनही निवृत्त होणार आहे.
Never saw bigger fan of MS Dhoni than Virat kohli, GOAT recognising GOAT ❤ pic.twitter.com/qwehEPuQSe
— SUPRVIRAT (@ishantraj51) November 21, 2022
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने अनेकजण नाराज झाले. त्यातील सर्वाधिक नाराज विराटच झाला, हे अनेकदा दिसून आले आहे. तो अनेकदा धोनीबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्याची जाणीवही करून देतो. तसेच विराटच्या या इंस्टाग्रामच्या स्टोरीने धोनी चांगलाच ट्रेंडही होत आहे. Virat Kohli Instagram Story About MS Dhoni Goes Viral
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या 264 धावांही कमी पडल्या, जेव्हा नारायण जगदीसनने केली ‘एवढ्या’ धावांची विक्रमी खेळी
एन जगदीसनचा वनडे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; विराट कोहली, कुमार संगकाराला टाकले मागे