येत्या रविवारी (२८ ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघ अशी भारत-पाकिस्तानची ओळख आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील खराब काळातून जात असला, तरी पाकिस्तान संघ त्याला हलक्यात घेणार नाहीये. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यापूर्वी माध्यमांमध्ये याविषयी अनेक बातम्या समोर आल्या आहेत. माजी दिग्गजांनीही या सामन्याविषयी वेगवेगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोन्ही संघांतील खेळाडूंमधील खेळाडू वृत्ती दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाहायला मिळाली. आता सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) याचीही या सामन्यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्ताकच्या मते विराटला मैदानात सराव करताना पाहिल्यानंतर अजिबात वाटत नाही की, तो खराब फॉर्ममध्ये आहे.
पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक म्हणाला की, “आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो एक खतरनाक फलंदाज होता आणि आजही तेवढाच खतरनाक आहे. मागच्या काही काळापासून तो फॉर्ममध्ये नाहीये याचा अर्थ असा अजिबात नाही की, आपण त्याला हलक्यात घेऊ शकतो. काल मी त्याला मैदानात सराव करताना पाहिले, ज्या पद्धतीने तो खेळत होता, त्यावरून असे वाटले नाही की, तो संघर्ष (धावांसाठी) करत आहे. ही एका महान खेळाडूची लक्षणे आहेत.”
मुश्ताकच्या मुते विराट सध्या खराब फॉर्ममध्ये असला, तरी तो मागचा मोठा काळ जगातील सर्वोत्तम फलंदाज राहिला आहे. “एका प्रशिक्षकाच्या रूपात तुम्हाला नेहमी पाहावे लागते की, खेळाडू कशा पद्धतीने सराव करत आहे. त्यांच्या सहकारी खेळाडूंना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतो आणि विरोधी संघातील खेळाडूंशी कसा बोलतो. तो सध्या कठीण काळातून जात आहे, पण आपण विसरले नाही पाहिजे की हा तोच खेळाडू आहे, ज्याने १०, १२ किंवा १५ वर्षा जगावर राज्य केले आहे. हा खराब काळ त्याच्या यशावर भारी पडू शकत नाही. तो योग्य वेळ शोधत आहे. त्याच्या डोक्यात पूर्ण नियोजन आहे. तो खतरनाक होता, खतरनाक आहे आणि आम्ही त्याच्यापासून सावध राहू,” असे मुश्ताक पुढे म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदी, वसीम बाहेर झाल्याने फिका पडला पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक, भारतासाठी असेल ‘मौका मौका’!
तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे! सारा कधी करतेय लग्न? तिने स्वत:च सांगितलंय
मौका मौका! भारताशी भिडण्यासाठी ‘आझम आणि संघा’चा नवा अवतार, पाहा नवीन जर्सी