भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली वन डे वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याची संघात निवड झाली होती, परंतु वैयक्तिक कारणामुळे त्याने माघार घेतली. दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी त्याने ही सुट्टी घेतली होती. पण, आता तो आगामी इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये खेळणार की नाही, याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र अशातच विराट कोहली IPL 2024 पूर्वी लंडनहून भारतात परतला असून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यामुळे IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण विराट कोहली तब्बल 2 महिन्यांनंतर भारतात परतला आहे. यामुळे आरसीबी चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तसेच आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी आरसीबीचे सर्व मोठे खेळाडू एकापाठोपाठ एक संघात सामील होत होते, पण विराट कोहलीबाबत काहीही अपडेट समोर आली नव्हती. मात्र आता किंग कोहली लंडनहून भारतात परतला आहे. आता तो एक-दोन दिवसांत आरसीबीच्या ताफ्यात सामील होईल.
मीडियातील रिपोर्ट्सनुसार विराट त्याच्या मुलाच्या जन्मासाठी त्याच्या कुटुंबासोबत लंडनला गेला होता. त्याला 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. हे त्याचे आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचे दुसरे अपत्य असून त्याला वामिका नावाची 3 वर्षांची मुलगी देखील आहे. तसेच बेंगलोर संघ 19 मार्चपासून सरावाला अधिकृत सुरुवात करणार असून त्यापूर्वी विराट संघात जोडला जाणार आहे. त्यानंतर बेंगलोरचा पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होणार आहे.
Virat Kohli has landed in India. 😍
– Never missed the GOAT so much! pic.twitter.com/diUVuQt08H
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2024
दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा आणि शतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तसेच एका सीझनमध्ये सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. 2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या. याबरोबरच, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 6 धावा करताच तो टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024चा अंतिम सामना पावसामुळे वाया गेल्यास कोण ठरेल विजेता? वाचा सविस्तर
- एवढ्या भीषण अपघातानंतर अवघ्या 14 महिन्यांत कसा तंदुरुस्त झाला ऋषभ पंत? डॉक्टरांनी सांगितली संपूर्ण कहाणी