आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात (21 मार्च) पासून होणार आहे. तत्पूर्वी स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार होता. विराट कोहलीनंतर, फाफ डु प्लेसिसने (Faf Du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले, परंतु आता फ्रँचायझीने प्लेसिसलाही लिलावापूर्वी रिलीज केले.
पण आयपीएल 2025चा हंगाम सुरू होण्यापूर्वी, मोठा प्रश्न असा आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) नेतृत्व कोण करणार? विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठे संकेत दिले आहेत.
‘स्पोर्ट्स तक’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश मेनन (Rajesh Menon) म्हणाले की, “आमचा कर्णधार कोण असेल हे आम्ही अद्याप ठरवलेले नाही, परंतु आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे कर्णधार होण्यास सक्षम आहेत. आमच्या संघाचे नेतृत्व करू शकणारे किमान 4-5 खेळाडू आहेत. आम्हाला काय करायचे आहे यावर आम्ही चर्चा केलेली नाही, आम्ही चर्चा करू आणि निष्कर्षापर्यंत पोहोचू. पण मी हे सांगू इच्छितो की आमच्या संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली आहे, त्याने 143 सामन्यात आमच्या संघाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये आम्ही 66 सामने जिंकले, तर 70 सामन्यात आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.”
अलिकडेच, आयपीएल मेगा लिलावात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फिल साल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, टिम डेव्हिड, भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा, देवदत्त पडिकल आणि जोश हेझलवुड सारख्या स्टार खेळाडूंना सामील केले. यावर राजेश मेनन म्हणतात की, “तुम्ही आमच्या खेळाडूंकडे पहा खरंतर आम्ही कोणते खेळाडू खरेदी करायचे याची आधीच तयारी केली होती. आमचे भारतीय खेळाडू कोण असतील आणि विदेशी खेळाडू कोण असतील याबद्दल आमची मानसिकता अगदी स्पष्ट होती.”
महत्वाच्या बातम्या-
IND vs ENG; टी20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूला मिळाले बक्षीस, भारतीय संघात झाला समावेश
वैयक्तिक मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी धमाका
वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत