---Advertisement---

फलंदाजीस पोषक हेडिंग्ले मैदानावर कोहलीकडे २३००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी, गरज आहे फक्त…

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेली ५ सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक स्थितीत आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर भारताने १५१ धावांनी यजमानांचा पराभवाची धूळ चारली. यानंतर आता २५ ऑगस्ट्पासून लीड्स येथे होणारा तिसरा कसोटी सामना जिंकण्यात पाहुण्या संघाला यश येईल का यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. मागील ५४ वर्षांपासून लीड्सच्या मैदानावर भारतीय संघ अपराजित राहिला आहे. ही विक्रमी कामगिरी पुढेही कायम ठेवण्यासाठी विराट आणि संघ आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेल.

अशात कर्णधार विराट कोहली मोठ्या आकडी धावा करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. याच कोहलीकडे या सामन्यात मोठा विक्रम करण्याचीही संधी असेल.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ कसोटी सामन्यात कोहलीची बॅट शांत राहिली. तो पहिल्या २ सामन्यांतील ३ डावात केवळ ६२ धावा करू शकला. परंतु फलंदाजीस पोषक असलेल्या लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर त्यांच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होऊ शकतो. जर त्याने या सामन्यात ६३ धावा फटकावल्या, तर तो आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २३००० धावा पूर्ण करेल.

कोहलीने आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत २२९३७ धावा केल्या आहेत. त्यामुळे २३ हजार धावांचा गाठण्यापासून तो केवळ ६३ धावांनी दूर आहे. त्यामुळे लीड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडे २३ हजार धावांचा आकडा गाठण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावे आहे. त्याने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक ३४३५७ धावा केल्या होत्या. तेंडूलकरनंतर राहुल द्रविडचा दुसरा क्रमांक लागतो. तो २४२०८ धावांसह या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोहली तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच सौरव गांगुली (१८५७५ धावा) आणि एमएस धोनी (१७२६६ धावा) हेदेखील टॉप-५मध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---