---Advertisement---

विराट कोहलीने धोनीला मागे टाकत हा विक्रम केला आपल्या नावे !

On: शनिवार, डिसेंबर 2, 2017 1:18 PM
---Advertisement---

दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिल्ली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध एमएस धोनीचा एक खास विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्या खेळाडूंच्या यादीत कोहलीने आता धोनीला मागे टाकले आहे

या विक्रमासाठी विराटला केवळ २३ धावांची गरज होती.

विराटने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२० सामन्यात ३५० डावात खेळताना ५४.३२च्या सरासरीने १६,०२५ धावा केल्या आहेत.

तसेच धोनीने ४८२ सामन्यात खेळताना ४५.१४ च्या सरासरीने १५,९८३ धावा केल्या आहेत. यात त्याची १६ शतके तर १०० अर्धशतके सामील आहेत.

विराटने हा विक्रम करताना धोनीपेक्षा तब्बल १६२ सामने कमी खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यात ३४,३५७ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१ सचिन तेंडुलकर: ३४,३५७ धावा
२ राहुल द्रविड :२४,२०८ धावा
३ सौरव गांगुली:१८,५७५ धावा
४ वीरेंद्र सेहवाग: १७,२५३ धावा
५ विराट कोहली: १६,०२५ धावा
६ एम एस धोनी:१५,९८३ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment