भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना २०१८मध्ये १००० धावांचा टप्पा पार केला.
त्याने यावर्षी कसोटीत ९ सामन्यांत ५९.८८ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या. यात त्याच्या ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
कोहलीच्या जास्त धावा परदेशातच-
यावर्षी कोहलीने खेळलेल्या ९ पैकी ८ कसोटी सामने हे परदेशात होते. कोहली दक्षिण आफ्रिकेत ३ तर इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामने खेळला. या दोन्ही मालिकेत कोहली हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. या दोन मालिकांत कोहलीने ८ सामन्यात तब्बल ८७९ धावा केल्या.
शतकाबरोबर केले खास विक्रम-
कोहलीने सलग तिसऱ्या वर्षी कसोटीत १ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने २०१६मध्ये १२१५ तर २०१७ मध्ये १०५९ धावा केल्या होत्या. जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणुन सलग तीन वर्ष कसोटीत १ हजारपेक्षा जास्त धावा करणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.
भारतीय फलंदाजांना जे जमले नाही ते कोहलीने करुन दाखवले-
आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला सलग तीन वर्ष कसोटीत १ हजारपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. तसेच जागतिक क्रिकेटमध्ये मेथ्यू हेडन (५), स्टिव स्मिथ (४), मार्क ट्रेक्सोथिक (३), ब्रायन लारा (३) आणि केविन पीटरसन (३) यांनाच हा पराक्रम करता आला आहे. अशी कामगिरी करणारा तो फक्त भारतातीलच नाही तर संपुर्ण आशिया खंडातील पहिला खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–तलवारबाजी स्टाईल सेलिब्रेशनसह राजकोट बाॅय जडेजाचा खास विक्रम
–टीम इंडियाकडून खेळलेल्या खेळाडूचे पंचासोबत भांडण, तब्बल २० मिनीटं थांबवला सामना