मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (२३ एप्रिल) रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) संघात सामना झाला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने ९ विकेट्स आणि ७२ चेंडू राखून जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या या मोठ्या पराभवामुळे माजी कर्णधार विराट कोहलीने टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. पण असे असले तरी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी विराटची पाठराखण केली आहे.
विराट (Virat Kohli) या सामन्यात त्याचा पहिलाच चेंडू खेळताना मार्को जान्सेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो सलग दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये पहिलाच चेंडू खेळताना बाद झाला आहे. विराटसाठी आयपीएलचा १५ वा (IPL 2022) हंगाम फारसा चांगला ठरत असल्याचे दिसून येत नाहीये. त्याला या हंगामात ८ सामन्यांत १७ च्या सरासरीने ११९ धावाच करत आल्या आहेत.
विराटच्या या खराब फॉर्मबद्दल बोलताना बांगर (Sanjay Bangar) म्हणाले, ‘विराट एक असा खेळाडू आहे, ज्याने सातत्याने बेंगलोर (Royal Challenger Bangalore) संघासाठी चांगले प्रदर्शन केले आहे. कोणताही खेळाडू असला तरी, तो अशा वाईट काळातून जात असतो. त्याने हंगामाची सुरुवात चांगली केली होती. तो एका सामन्यात धावबाद झाला आणि त्यानंतर त्याच्या बॅटची कड घेत चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात गेला.’
‘तो त्याच्या क्षमतेनुसार सर्वकाही करत आहे. तो त्याच्या फिटनेसवर आणि कौशल्यावर काम करत आहे. तो दबाव घेत नाही. तो नियमित पणे ब्रेक घेत आहे आणि तो पुढेही चांगली कामगिरी करत आहे’, असेही बांगर म्हणाले.
विराटबद्दल यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हणले होते की, विराटला विश्रांतीची गरज आहे. त्याच्यासारख्या खेळाडूला आपण गमावू शकत नाही, त्याच्याकडे अजून ५-६ वर्षांचे क्रिकेट बाकी आहे.
विराट १५ वर्षात ५ वेळा गोल्डन डक
विराट गेल्या १५ वर्षांत आयपीएलमध्ये ५ वेळा पहिल्या चेंडूवर शुन्यावर म्हणजेच गोल्डन डकवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या १५ व्या हंगामातच तो सलग दोन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध देखील पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला होता. यापूर्वी तो २००८, २०१४ आणि २०१७ साली प्रत्येकी एकदा गोल्डन डकवर बाद झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादपुढे विराटसह आख्खी आरसीबी फेल, नेटकऱ्यांनी मीम्सचा धुरळा उडवत केले भरपूर ट्रोल
सचिनला लाडक्या लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्यासाठी जे काही केले आहे…’
टी२० विश्वचषकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर मला कित्येक रात्र वाईट स्वप्न पडत होती- हसन अली






