सध्या सुरु असलेल्या वादाचा कोहलीच्या ना कामगिरीवर परिणाम झाला ना त्याच्या सोशल माध्यमांवरील प्रसिद्धीवर. कोहली सध्या फेसबुकवर सलमान खानला मागे टाकून दोन नंबरचा सेलिब्रिटी बनला आहे.
सध्या विराटच्या फेसबुक पेजला ३५,७४०,७८१ एवढे लाइक्स असून बॉलीवूड स्टार सलमान खानला ३५,१२९,२२८ एवढे लाइक्स आहेत. सध्या भारतात सर्वात जास्त लाइक्स आहेत त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि त्यांचे एकूण लाइक्स आहेत ४२,३०१,९५४.
मोदी यांना भारताच्या या क्रिकेट कर्णधारापेक्षा जवळजवळ ६० लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तर सलमानपेक्षा विराटला ६लाख लाइक्स जास्त आहेत.
Virat Kohli become second most followed Indian in Facebook..
Modi: 42.2 million
Kohli: 35.7 million— Broken Cricket (@BrokenCricket) June 26, 2017
कोहलीचा हा बोलबाला फक्त फेसबुकपुरता मर्यादित नसून ट्विटरवर १६मिलियन तर इंस्टाग्राम १४ मिलियन फॉलोवर्स या स्टारला आहेत.
विराटाच्या ३५,७४०,७८१ फॉलोवर्स ८३% फॉलोवर्स हे भारतीय असून ५% फॉलोवर्स बांग्लादेशच आहेत. तर तब्बल ११ लाख पाकिस्तानी फॅन्सने विराटचं पेज लाइक केलं आहे. गेल्या ६ महिन्यात विराटाचे फॅन्स ३३मिलियन वरून ३६ मिलियन झाले आहेत.