युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळत आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या भारतीय संघासाठी हा औपचारिक सामना असेल. या सामन्या बरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली याचा टी२० कर्णधार म्हणून भारतीय संघासोबतचा प्रवास संपुष्टात येईल. मात्र, त्याबरोबरच तो एक नवा विक्रम आपल्या नावे करेल.
कर्णधार म्हणून अखेरचा सामना
विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली हा २०१७ मध्ये भारतीय संघाचा पूर्णवेळ टी२० कर्णधार म्हणून नियुक्त झालेला. त्याच्या कारकीर्दीत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने नेतृत्व केलेल्या ४९ सामन्यांमध्ये भारतीय संघाने तब्बल २९ विजय मिळवले आहेत. तर १६ सामन्यात संघाला पराभव पत्करावे लागले होते. तर दोन सामने अनिर्णित दोन सामने बरोबरीत सुटले. विराट हा एमएस धोनीनंतर (७२ सामने) सर्वाधिक टी२० सामन्यात नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार आहे.
कर्णधारपद सोडण्याची केली होती घोषणा
सप्टेंबर महिन्यात आयपीएल सुरू होण्यापूर्वी विराटने आपण विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली होती. तसेच तो आयपीएलमध्ये यापुढे आरसीबीचे नेतृत्व करणार नाही. विराटसह संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील आपल्या पदावरून मुक्त होतील. त्याचा उत्तराधिकारी म्हणून उपकर्णधार रोहित शर्माचे नाव सध्या आघाडीवर आहे.
विराटने संघाला नेले वेगळ्या उंचीवर
टी२० क्रिकेटमध्ये विराट कोहली याने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्याने केवळ एका विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापासून भारतीय संघ वंचित राहिला. मात्र, त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड या देशांमध्ये टी२० मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली आहे. तसेच, त्याने फलंदाज म्हणून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पद्म पुरस्कारांचे झाले वितरण; क्रीडाक्षेत्रातील पीव्ही सिंधू, मेरी कोमसह ‘हे’ ८ मान्यवर ठरले मानकरी
‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय