सोशल मीडियावर तुम्ही खेळाडू, नेता किंवा अभिनेत्यासारखे दिसणारे हुबेहूब व्यक्ती पाहिले असतील. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर आता भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा (Virat Kohli Look a like Person) फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोहलीचे चाहतेही या फोटोवर कमेंट करत आहेत. विराट कोहली सारखा दिसणारा हा व्यक्ती मक्का विकत आहे. त्याचा हा फोटो पाहून लोक त्याला ‘विराट कॉर्नली’ म्हणत आहेत.
सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, जो भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीसारख्या व्यक्तीचा फोटो दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात असून त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत.
‘यो यो फनी सिंग’ नावाच्या हँडलवरून विराट कोहलीचा लूक लाइक असलेला एक फोटो ट्विटरवर ट्विट करण्यात आला आहे. या फोटोतील व्यक्ती चेहऱ्यावरून कोहलीसारखी दिसत आहे. त्याने डोक्यावर काळी टोपी घातली असून काळ्या आणि लाल रंगाचा स्वेटर घातला आहे. तो हातगाडीवर मक्का विकत आहे. आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले असून अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. कोहलीच्या लूकसारखा दिसणारा हा फोटो ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
Virat Cornli pic.twitter.com/5ZSY2VKf2q
— Yo Yo Funny Singh (@moronhumor) December 31, 2021
याआधीही कोहलीसारखी हुबेहूब चेहरापट्टी असणाऱ्या बऱ्याचशा व्यक्तींचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी रोहित शर्मा, अरविंद केजरीवाल आणि सलमान खानसह इतर अनेक सेलिब्रिटींसारखे दिसणारे लोकांचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोहलीशी संबंधित जो फोटो व्हायरल होत आहे, तो कुठला आहे याची अद्याप माहिती झालेली नाही.
हेही वाचा- विराट माध्यमांसमोर कधी येणार ? प्रशिक्षक द्रविड यांनी दिले ‘हे’ उत्तर
विराट कोहली हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो सध्या भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताचा हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज म्हणून ओळखला जातो. कोहलीला ईसपीएनच्या 2016 च्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंच्या यादीत आठव्या क्रमांकावर नाव होते. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो आणि 2013 पासून संघाचा कर्णधार आहे. परंतु त्याचा फॉर्म सध्या खाली येताना दिसत आहे. तसेच त्याचे अनेक चाहते त्यांच्या तळपत्या बॅटची वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
INSvsRSA: द. आफ्रिकन कर्णधाराची टीम इंडियाला चेतावणी; म्हणाला, ‘डी कॉक गेल्याचा आम्हाला फरक…’
ना धोनी, ना कोहली; भज्जीच्या ‘ऑल टाईम कसोटी प्लेइंग इलेव्हन’मध्ये फक्त ‘या’ २ भारतीयांची नियुक्ती