---Advertisement---

आता क्रिकेट सोडून विराट कोहलीने केला याचा सराव सुरु…

On: मंगळवार, एप्रिल 30, 2019 8:15 PM
---Advertisement---

बंगळूरु। आज(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 49 वा सामना रंगणार आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली या आयपीएलच्या 12 व्या मोसमात 13 पैकी तब्बल 10 नाणेफेक हरला आहे. त्यामुळे विराटने आजचा नाणेफेक हरल्यानंतर हसून त्याबद्दल प्रतिक्रिया दिली.

त्यानंतर स्मिथशी बोलताना विराट म्हणाला, 10 व्यांदा नाणेेफेक हरलो आहे. त्यावर स्मिथलाही हसू आले. तसेच विराटचे असे वाक्य ऐकून निवेदक मेलानी जोन्सलाही हसू आले.

तीने जेव्हा विराटला नाणेफेकीनंतर प्रश्न विचारला की तू या नाणेफेकीमध्ये काही बदल करु शकतो का तेव्हा विराट गमतीने म्हणाला, ‘मी तूम्ही आमची ओळख करुन देण्याआधी आधी नाणे उडवण्याचा सराव करत होतो. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी 13 पैकी 10 नाणेफेक हरलो आहे. ते नाणे घरंगळत जाते आणि प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल येतो.’

विराटने रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धही नाणेफेक हरल्यानंतर मजेशीर पद्धतीने सेलिब्रेशन केले होते. दिल्ली विरुद्ध विराट 9व्यांदा नाणेफेक हरला होता. त्यावेळी त्याने नाणेफेक हरल्याचे सेलिब्रेशन करताना हातवारे करुन 9 वेळा नाणेफेक हरल्याचे सांगितले होते. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

विराट कर्णधार असलेल्या बेंगलोरच्या संघाचे आयपीएल 2019 मधील आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले आहे. त्यांना 12 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकण्यात यश आले आहे.

आजचा सामना हा राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि बेंगलोरचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिसचा आयपीएल 2019 मधील शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर ते 2019 विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. 2 मेपासून ऑस्ट्रेलियाच्या ट्रेनिंग कॅम्पला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भुवनेश्वर कुमार या खेळाडूसाठी बनला कॅमेरामन, पहा व्हिडिओ

विराट कोहलीला मदत करणे ही माझी जबाबदारी – रोहित शर्मा

गे नसल्याचे जेम्स फॉकनरने केले स्पष्ट; त्या फोटोमागील सत्याचाही केला खूलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment