आज बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना भारताने ९ विकेट्सने विजय मिळविला. यात कर्णधार कोहलीने नाबाद ९६ धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु याबरोबरच विराटने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. त्यातील काही ठळक विश्वविक्रम
#१ सर्वात कमी डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८००० धावा. विराटने ही कामगिरी १७५ डावात केली. यापूर्वी हा विक्रम एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर होता. त्याला एवढ्याच धावांसाठी १८२ डाव लागले होते.
#२ विराट कोहली जगातील पहिला खेळाडू बनला ज्याने आयसीसीने आयोजित केलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना १००० धावा केल्या आहेत. यात विश्वचषक. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी२० विश्वचषक यांचा समावेश आहे.
#३ आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये धावांचा पाठलाग करताना तब्बल १३० ची सरासरी विराट कोहलीने राखली आहे. यात विश्वचषक. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी२० विश्वचषक यांचा समावेश आहे.
#४ कोहलीची कर्णधार पहिलीच आयसीसीने आयोजित केलेली स्पर्धा असून भारताला त्याने अंतिम फेरीत नेले आहे. विशेष म्हणजे विराटचा एकदिवसीय क्रिकेट मधील सार्वधिक स्कोर आहे १८३ आणि यापूर्वी अशी कामगिरी करणाऱ्या गांगुली आणि धोनीचाही हा स्कोर आहे १८३.
#५ एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची सरासरी आहे ९५.२०. जगातील ही दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी आहे. विराटपुढे आहे एमएस धोनी आणि सरासरी आहे ९७.३६