रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात गुरुवारी (१९ मे) आयपीएल २०२२चा ६७वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना बेंगलोर संघासाठी प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. त्यामुळे बेंगलोरने हा सामना जिंकण्यासाठी आपला पूर्ण जोर लावला. या सामन्यादरम्यान धावा बनवण्यासाठी झगडत असलेल्या विराट कोहली याने धुव्वादार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह त्याने विक्रमांची रास घातली आहे.
गुजरातविरुद्ध विराटचे दुसरे अर्धशतक
गुजरातच्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून सलामीला फलंदाजीला येत विराटने विस्फोटक खेळी केली. अवघ्या ३३ चेंडूंमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढे ५४ चेंडूत ७३ धावा करत तो बाद झाला. हे विराटचे आयपीएल कारकिर्दीतील ४४वे अर्धशतक होते. तसेच चालू हंगामातील केवळ दुसरे अर्धशतक होते.
विशेष म्हणजे, यापूर्वीही विराटने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता आणि आयपीएल २०२२मधील आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात त्याने ५३ चेंडूंमध्ये ५८ धावांची शानदार खेळी केली होती.
FIFTY for @imVkohli off 33 deliveries 💪👏
Live – https://t.co/XDXRjk2XBc #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/CdNEvQsE18
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
ऐतिहासिक कामगिरीला गवसणी
याखेरीज विराटने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला करताना आयपीएलमधील आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. असे करणारा आयपीएल इतिहासातील केवळ पहिलाच फलंदाज बनला आहे.
बेंगलोरकडून सर्वाधिक धावांचा विक्रम
इतकेच नव्हे तर, विराट एका फ्रँचायझीकडून कोणत्या टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७००० धावा करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. याबाबतीत इतर कोणताही फलंदाज त्याचा हात धरू शकणार नाही. कारण या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला सुरेश रैना याने चेन्नई सुपर किंग्जसाठी ५५२९ धावा केल्या आहेत. बेंगलोरकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराटच्या आसपासही कोणी नाही. एबी डिविलियर्स ४५२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ख्रिस गेल ३४२० धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
GTvsRCB | विराट-मॅक्सवेलचा झंझावात, ८ विकेट्सने मॅच जिंकत आरसीबीने कायम राखले प्लेऑफमधील आव्हान
इंग्लंड दौऱ्यापूर्वी जडेजा आणि सूर्यकुमारच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट, संघात निवड होणे निश्चित; पण…
ग्लेन मॅक्सवेलने पकडला लाखात एक झेल! हवेत झेपावत एका हाताने घेतला शुबमनचा ब्लाइंडर कॅच