भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मसोबत लढत आहे. अशातही त्याने आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एक मोठा विक्रम नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये 100 टी-20 सामने खेळणारा विराट कोहली भारताचा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यापूर्वी फक्त रोहित शर्मा भारतासाठी 100 टी-20 सामने खेळला आहे. या 100 टी-20 सामन्यात विराटने सर्वाधिक 3343 धावा देखील केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 त पहिल्या 100 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावावर नोंदवला आहे. विशेष म्हणजे त्याने न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टीलला मागे सारत हा विक्रम रचला आहे. गप्टिलने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 100 टी-20 सामन्यांत 2874 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच याने तिसऱ्या स्थानावर सर्वाधिक 2855 धावा केल्या आहेत.
सुरुवातीच्या 100 टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
3343 – विराट कोहली (भारत)
2874 – मार्टीन गप्टिल (न्यूझीलंड)
2855* – ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)
2758 -पॉल स्टरलिंग (आयर्लंड)
2696* – बाबर आझम (पाकिस्तान)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘बाप देशभक्तीचं उदाहरण देत असताना, पोराकडून तिरंग्याचा तिरस्कार!’ बीसीसीआय सचिव जय शाह ट्रोल
तिकडे पाकिस्तान हारत होता, इकडे आझम फक्त रडायचा बाकी होता! ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
‘ती मॅच नाही, पंतला बघायला आलेली!’ उर्वशीने भारत-पाक सामन्यात हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ