---Advertisement---

सामनावीर कोहलीने शॅम्पेनची बॉटल दिली शास्त्रींना भेट

On: शुक्रवार, ऑगस्ट 24, 2018 4:42 PM
---Advertisement---

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारी ट्रेंटब्रिज मैदानावर तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ असे एकूण २०० धावा केल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला या सामन्यातील सामनावीर ही पुरस्कार देण्यात आला.

पण हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विराटकडून मजेशीर कृती पाहायला मिळाली. त्याने सामनावीर म्हणून मिळालेली शम्पेन ची बॉटल प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भेट दिली.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विराटने अशी कृती करत प्रशिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.

त्याचबरोबर बुधवारी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये विजय साजरा करण्यासाठी शाम्पेन आणण्यात आली होती. भारताच्या सपोर्टस्टाफने ही शाम्पेन घेत आनंद साजरा केला. त्याचबरोबर ड्रेसिंगरुममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी खेळाडूंना सहभागी होण्यासाठी विचारले होते.

पण खेळाडूंनी सांगितले की ते सध्या फक्त एकच कसोटी सामना जिंकले आहेत. ते जेव्हा मालिका जिंकतील तेव्हा आनंद साजरा करतील.

भारताचा इंग्लंड विरुद्ध चौथा कसोटी सामना 30 आॅगस्टपासून साउथँप्टनमध्ये सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या यादीत पीव्ही सिंधू पहिल्या दहामध्ये

एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment