---Advertisement---

स्वस्तात आऊट झाल्यावर तंबूत मॅक्सवेलची मालीश करताना दिसला विराट कोहली, Video तुफान Viral

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 11:59 PM
---Advertisement---

मंगळवारी (०५ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेला आयपीएल २०२२चा तेरावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ४ विकेट्सने जिंकला. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता. या सामना विजयात बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली बॅटने विशेष योगदान देऊ शकला नाही. स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र विराटने कॅमेराने लक्ष वेधून घेण्याजोगी कृती केली. तो या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याची मालीश करताना दिसला. त्यांच्यातील या ब्रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

राजस्थानच्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरने ५५ धावांवर फाफ डू प्लेसिसच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट फलंदाजीसाठी आला होता. परंतु ६ चेंडू खेळून ५ धावा करत तो धावबाद झाला. पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट पव्हेलियनमध्ये आपला संघ-सहकारी मॅक्सवेलची मालीश करताना दिसला.

मॅक्सवेलचे खांदे दाबत विराटने त्याच्या वेदना दूर केल्या. बेंगलोरच्या माजी कर्णधाराचे आपल्या संघ सहकाऱ्यांप्रती असलेले प्रेम पाहून चाहते विराटवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

https://twitter.com/dace7735/status/1511395006631665664?s=20&t=I4qDNyTEXzq9LbFliTTvuA

मॅक्सवेलला राजस्थानविरुद्ध न खेळवण्यामागचे कारण
दरम्यान मॅक्सवेल १८ मार्च रोजी त्याची प्रेयसी विनी रमणसोबत लग्न बंधणात अडकला आहे. त्यानंतर नुकताच मॅक्सवेल बेंगलोरच्या ताफ्यात सहभागी झाला असूनही त्याला राजस्थानविरुद्धचा सामना खेळता आला नाही. त्याने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून तो सध्या संघासाठी सराव करत आहे. तरीही तो या सामन्यात बेंगलोरच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकला नाही.

यामागचे कारण सांगाताना बेंगलोरचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट सांगितले आहे की, कोणताही करारात असलेला खेळाडू ०६ एप्रिलच्या अगोदर आयपीएलसाठी उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे ते कधी पोहोचतात हे महत्त्वाचे ठरत नाही. कारण, ते ०६ एप्रिलच्या अगोदर खेळू शकत नाहीत. बाकी संघांप्रमाणे आम्हालासुद्धा माहिती आहे. यामुळे आम्ही यानुसार योजना आखली आहे.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

RR vs RCB | बेंगलोरचा विजयरथ सुसाट, राजस्थानला ४ विकेट्सने हरवत नोंदवला सलग दुसरा विजय

विराटने घेतला पडीक्कलचा सुपर कॅच, पण नंतर मैदानावर जे झालं ते सिनेमापेक्षा कमी नव्हतं

IPL2022 | जोस बटलरचे RCBविरुद्ध ‘६ चेंडू आणि ६ षटकार’, विक्रमाच्या मोठ्या यादीत नोंदवलं नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---