---Advertisement---

नागपूरात पोहोचताच विराट धडकला शार्कच्या घरी! फोटोच्या कॅप्शनने वेधलेय लक्ष

On: गुरूवार, सप्टेंबर 22, 2022 4:54 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा आशिया चषक स्पर्धेपासून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्याने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 200 पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला आहे. असे असले तरी त्याच्याकडून भारतीय संघाला आणि चाहत्यांना आणखी अपेक्षा असतील. मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ नुकताच नागपूर येथे पोहोचला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी (23 सप्टेंबर) हा सामना खेळला जाईल. भारतीय संघ नागपूर येथे पोहोचल्यानंतर विराट हा एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी पोहोचला.

विराट कोहली नागपूर येथे पोहोचल्यानंतर त्याने शार्क टॅंक या रियालिटी शोमधून प्रसिद्ध झालेला भारतीय उद्योगपती अश्नीर ग्रोवर याची भेट घेतली. अश्नीर हा भारत पे या कंपनीचा माजी सीईओ आहे. शार्क टॅंक या युवा उद्योजकांसाठीच्या शो मधून त्याला प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या रोखठोक बोलण्याने तो अनेकांचा आवडता शार्क देखील बनला होता. विराट कोहलीसोबत भेट झाल्यानंतर त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्याने लिहिले,

‘बेन स्टोक्ससाठी असे बोलण्याची आवड असणारी दिल्लीची दोन मुले काय म्हणत असतील? विराट कोहलीला नागपूर सामन्यासाठी शुभेच्छा.’

विराट आणि अश्नीर मूळचे दिल्लीकर असून, सध्या विराट मुंबईत तर अश्नीर नागपुरात स्थायिक आहे. भारत पे मधील इतर भागधारकांनी अश्नीरवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवत त्याला कंपनीतून बाहेर गेले होते. मात्र, त्याने इतर ठिकाणी देखील गुंतवणूक केली असल्याने तो आपली पत राखण्यात यशस्वी ठरला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---