इंडियन प्रीमियर लीगचा १८वा सामना शनिवारी (दि. ०९ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला. विराट कोहलीने मुंबईला ८ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी खेळत ३६ चेंडूत ४८ धावा केल्या. परंतु तो मुंबईचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसच्या चेंडूवर बाद झाला. कोहलीने या अगोदर कोलकाता विरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात ४४ धावा केल्या होत्या.
सलामीवीर अनुज रावतने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या आणि फाफ डू प्लेसिसने १६ धावा केल्या. या सामन्यानंतर विराट कोहली भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरला भेटला, ज्याचा फोटो विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आरसीबीने सुद्धा हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “एका फोटोत १७० आंतरराष्ट्रीय शतके.” त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत, तर विराटने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके खेळली आहेत. चाहते त्याच्या ७१व्या शतकाची आतुरतने वाट पाहत आहेत. विराटने फोटो शेअर करत लिहिले आहे की, “तुम्हाला भेटून नेहमीच छान वाटते, पाजी.”
या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईला ४ सामन्यांमध्ये अपयश आले आहे, तर सीएसकेला सुद्धा ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईने आयपीएल इतिहासात ५ वेळा विजेतेपद पटकवले आहे, तर सीएसकेने देखील ४ वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे. सचिन तेंडुलकर आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. तसेच, तो सध्या मुंबईचा मार्गदर्शक आहे.
विराट कोहली सध्या आरसीबीचा कर्णधार नसून सध्या संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. विराट हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच, त्याने एका हंगामात देखील सर्वाधिक धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs RCB: सूर्यकुमार यादवने लगावला शानदार हेलिकाॅप्टर शाॅट, व्हिडीओ होतोय व्हायरल
रविंद्र जडेजाने कोणाच्या डोक्यावर फोडले सलग चौथ्या पराभवाचे खापर? घ्या जाणून






