मुंबई। आज बीसीसीआयने ट्विटरवर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एम.एस.धोनी यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओच्या खाली ‘द ब्रोमान्स’ लिहिले आहे.
हा व्हिडीओ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर चालू असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे सामन्यांदरम्यानचा आहे. ज्यात धोनीच्या डोळ्यात कचरा गेला म्हणून विराट त्याला मदत करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल झाला आहे.
The Bromance 😍 #TeamIndia #INDvNZ pic.twitter.com/HBhP0dhYPl
— BCCI (@BCCI) October 22, 2017
या व्हिडीओने विराट, धोनीच्या चाहत्यांना मात्र खूप आनंद दिला आहे. ‘माहिराट’ या हॅशटॅगसह हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
#Mahirat ❤️@imVkohli @msdhoni 💕💕💕#INDvNZ pic.twitter.com/8dLJBrMBZx
— विratian S. (@vvsstaes) October 22, 2017
https://twitter.com/ankuleo/status/922092023154327552
I just love them..love them a lotttttt.. #Mahirat 😭💞💞💞💞💞💞💞 https://t.co/slPmM8UgVK
— Vismaya 🙂 (@vismayavega) October 22, 2017
Did you notice our #MahiRat is now on the crease now ??? #Dhoni #Kohli #INDvNZ
— 🇮🇳 MahiRat FanClub 🇮🇳 (@MahiRatFans) October 22, 2017
https://twitter.com/imbrishi/status/922042947943784448
आपण नेहमीच विराट आणि धोनीला मैदानावर एकत्र चर्चा करताना बघितलं आहे. बऱ्याचदा विराट अनुभवी धोनीचा सल्ला घेताना दिसतो. ह्या दोघांचीही मैदानावरची उत्तम केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळते. तर कधी धोनी विराटला आवाज देताना चिकू अशा नावाने आवाज देताना स्टॅम्पमाईक वरून ऐकले आहे.
विराटने तर दिवाळीनिमित्त नुकत्याच झालेल्या एका चॅनेलच्या मुलाखतीत बॉलीवूड स्टार अमीर खानच्या चिकू हे नाव कसं प्रसिद्ध झालं या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते की हे नाव सगळ्यांना कळालं ते धोनीमुळे कारण तो त्याला या नावाने हाक मारतो जे स्टॅम्पमाईक मधून ऐकू जात.
या दोघांनाही एकमेकांबद्दल असलेला आदरही आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. त्यामुळेच हा व्हिडीओ म्हणजे ‘माहिराटीअन्ससाठी’ बीसीसीआय आणि विराट धोनी जोडीने दिलेलं दिवाळीची भेट आहे.