मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. ओल्ड ट्रॅफर्डवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा 2019 विश्वचषकातील तिसरा विजय ठरला आहे.
याबरोबर हा सामना भारताचे आजी-माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनीसाठीही खास ठरला आहे.
हा सामना एमएस धोनीचा वनडे कारकिर्दीतील 344 वा सामना होता. त्यामुळे धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये सामील झाला आहे.
त्याने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडची बरोबरी केली आहे. द्रविडनेही त्याच्या कारकिर्दीत 344 वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे हे दोघेही या यादीत संयुक्तरित्या 10 व्या क्रमांकावर आले आहेत.
विराटनेही केला खास विक्रम –
विराटचा हा वनडे कारकिर्दीतील 230 वा सामना होता. त्यामुळे सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत विराट पहिल्या 10 क्रिकेटपटूंमध्ये सामील झाला आहे. त्याने या यादीत जवागल श्रीनाथ यांच्या 229 सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकत 10 वा क्रमांक पटकवला आहे.
#सर्वाधिक वनडे सामने खेळणारे क्रिकेटपटू –
463 – सचिन तेंडुलकर
448 – माहेला जयवर्धने
445 सनथ जयसुर्या
404 – कुमार संगकारा
398 – शाहिद अफ्रिदी
378 – इंझमाम उल-हक
375 – रिकी पाँटिंग
356 – वासिम आक्रम
350 – मुथय्या मुरलीधरन
344 – एमएस धोनी/राहुल द्रविड
#सर्वाधिक वनडे सामने खेळणारे भारतीय खेळाडू
463- सचिन
344 – एमएस धोनी
344 – राहुल द्रविड
334 – मोहम्मद अझरुद्दीन
311 – सौरव गांगुली
304 – युवराज सिंग
271 – अनिल कुंबळे
251- विरेंद्र सेहवाग
236 – हरभजन सिंग
230 – विराट कोहली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप १०: भारत-पाकिस्तान सामन्यात झाले हे खास १० विक्रम
–टीम इंडियाला मोठा धक्का; धवन नंतर आता हा खेळाडू पडला पुढील सामन्यांतून बाहेर
–विश्वचषक २०१९: भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी दणदणीत विजय