भारत-बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. परंतु विराट कोहली काही विशेष करू शकला नाही.
कोहलीनं पहिल्या डावात केवळ 6 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात तो 17 धावा करून बाद झाला. या कसोटी सामन्यात कोहलीला बॅटनं चमकदार कामगिरी करता आली नसली, तरी त्यानं मैदानावर उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा सामन्यातील विजयाचा आनंद द्विगुणित होईल.
रन मशीन विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये आहे आणि तो हातानं ‘नागिन डान्स’च्या मूव्हज करतोय. कोहली बांगलादेशी क्रिकेटपटूंना त्यांच्याच शैलीत चिडवत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
That Reaction 😂🐍#ViratKohli | #IndvsBan pic.twitter.com/F1rRhhJBbZ
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrognxvirat) September 21, 2024
क्रिकेटच्या मैदानावर नागिन डान्सची सुरुवात बांगलादेशचा खेळाडू नजबुल इस्लामनं केली होती. 2018 मध्ये जेव्हा बांगलादेशनं निदाहास ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव केला, तेव्हा विजयाचा आनंद साजरा करताना नजमुलनं आपल्या सहकारी खेळाडूंसोबत नागिन डान्स करून श्रीलंकेच्या खेळाडूंची छेड काढली होती. यानंतर बांगलादेशच्या संघानं जेव्हाही सामना जिंकला, त्यानंतर ते अशा पद्धतीनं सेलिब्रेशन करताना दिसले. मात्र यावेळी विराटनं त्यांची मजा घेतला.
याआधीही विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो पहिल्या डावात शाकिब अल हसनला बाद केल्यानंतर डान्स करत होता. कोहली खेळासोबतच त्याच्या मिमिक्रीसाठीही ओळखला जातो. त्याच्या स्टाईलचे चाहते वेडे आहेत. कोहली अनेकदा मैदानावर नाचताना किंवा काहीतरी मजेशीर हातवारे करताना दिसतो, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतो.
हेही वाचा –
टीम इंडियाला मिळाले पुजारा-रहाणेचे उत्तराधिकारी! ही जय-वीरूची नवी जोडी करणार कसोटीत धमाल
580 सामने आणि 92 वर्ष! भारताच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं
‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी